बंदीवानांना भेटणाऱ्या नातेवाइकांची गर्दी ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:22 IST2018-11-16T23:13:41+5:302018-11-17T00:22:23+5:30
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना दिवाळी सणामुळे नातेवाईक कारागृहास भेटण्यासाठी येत असल्याने मोठी गर्दी होत आहे. नातेवाइकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने कैद्यांना नातेवाइकांशी दूरध्वनीवरून (कॉइन बॉक्स) बोलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून बोलण्याचा कालावधी पाच मिनिटां ऐवजी दहा मिनिटांचा केला आहे. यामुळे कारागृहात कैद्याला भेटण्यास येणाºया नातेवाइकांची गर्दी कमी होऊ लागली आहे.

बंदीवानांना भेटणाऱ्या नातेवाइकांची गर्दी ओसरली
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना दिवाळी सणामुळे नातेवाईक कारागृहास भेटण्यासाठी येत असल्याने मोठी गर्दी होत आहे. नातेवाइकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने कैद्यांना नातेवाइकांशी दूरध्वनीवरून (कॉइन बॉक्स) बोलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून बोलण्याचा कालावधी पाच मिनिटां ऐवजी दहा मिनिटांचा केला आहे. यामुळे कारागृहात कैद्याला भेटण्यास येणाºया नातेवाइकांची गर्दी कमी होऊ लागली आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात ३३०० हून अधिक कैदी असून त्यांना भेटण्यासाठी येणाºया नातेवाइकांना नियमानुसारच भेट घ्यावी लागते. ज्या कैद्यांची न्यायालयत सुनावणी सुरू आहे, खटल्याचा निकाल लागलेला नसल्याने कच्चे कैदी म्हणून ओळखले जातात. कच्च्या कैद्यांना दूरध्वनीवरून नातेवाइकांशी बोलण्याची सुविधा देण्यात येत नाही. त्यांना आठवड्यातून एकदाच नातेवाइकांना भेटता येते. शिक्षा झालेले पक्क्या कैद्यांना त्यांचे नातेवाईक महिन्यातून दोनदा भेटू शकतात. दिवाळी सणामुळे कैद्यांना कुटुंबीयांची आठवण व ओढ लागलेली असते. तशीच परिस्थिती त्यांच्या कुटुंबीयांची असते. नातेवाईक भेटायला आले नाही तर कैदी खचतो, आजारी पडतो. या बाबी लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने पक्क्या कैद्यांना कॉइन बॉक्सवरून नातेवाइकांशी बोलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महिन्यातून एकदाच नातेवाइकांशी पाच मिनिटे बोलण्याची असलेली मर्यादा प्रशासनाने वाढवून दहा मिनिटांपर्यंत करून दिली आहे. यामुळे कैदी व त्याच्या नातेवाइकांचे बोलणे सहजरीत्या होत असल्याने कारागृहात भेटायला येणाºया नातेवाइकांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे नातेवाइकांना येण्या-जाण्यासाठी होणारा खर्च, दगदग आदि सर्व बाबींतून सुटका झाली आहे.