ग्रामीण भागातील ‘बैलगाडी’नामशेष होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 16:20 IST2020-08-24T16:18:45+5:302020-08-24T16:20:03+5:30
लखमापूर : ग्रामीण भागात आधुनिक क्र ांतीचा प्रभाव पडल्यामुळे अनेक पुरातन वाहन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील शान समजली जाणारी ‘बैलगाडी’ ही आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

ग्रामीण भागातील ‘बैलगाडी’नामशेष होण्याच्या मार्गावर
लखमापूर : ग्रामीण भागात आधुनिक क्र ांतीचा प्रभाव पडल्यामुळे अनेक पुरातन वाहन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील शान समजली जाणारी ‘बैलगाडी’ ही आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
लाकडापासुन तयार केलेली बैलगाडी शेतकरी वर्ग शेती मालवाहतूकीसाठी व प्रवासासाठी वापरीत असतं. आता या लाकडी बैलगाडीचे रूप बदलून ती आता लोखंडाची बनली आहे. लोखंडी बैलगाडी ही ऊसवाहतुक व शेती कामासाठी वापरली जात आहे. परंतु बैलाच्या मानेवर असणारे ‘जु’ मात्र लाकडाचे आहे. तेवढी एकच खुण शिल्लक राहिली आहे. पण बैलगाडीचा प्रवासासाठीचा होणारा उपयोग बंदच झाला आहे. शेतीची नांगरणी, वखरणी, पेरणी आदीअनेक कामे बैलाच्या मदतीने केली जात . शेतकरी वर्गाच्या दावणीत जास्त बैल असली तर तो शेतकरी श्रीमंत समजला जायचा.बैल हा शेतकरी वर्गाचे वैभव समजले जायचे.त्यामुळे बैल पोळा सण उत्सव साजरा केला जातो. आता तो उत्साह यांत्रिकीकरणामुळे संपला आहे.
पण आता काळाच्या ओघात बैलगाडी नामशेष होत केल्याने नविन पिढीला फक्त चित्रातील बैलगाडी पाहायला मिळत आहे.
एक बैलगाडी तयार करण्यासाठी दोन महिने लागत होते. व त्या मोबदल्यात धान्यं अथवा काही पैसा मिळत असे. परंतु यांत्रिकीकरणामुळे लाकडी बैलगाडी बनविणे बंद झाले. व लोखंडी बैलगाडी आली. त्यामुळे लाकडी बैलगाडी बनविणारे कारागिर नामशेष झाले. आता आम्ही हे काम बंद केले आहे.
- बैलगाडी बनविणारे कारागिर. (फोटो २४ लखमापूर)