नाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 15:47 IST2019-01-19T13:01:26+5:302019-01-19T15:47:15+5:30

महापालिकेच्या महासभेत शहर बस वाहतुकीसाठी परिवहन समिती स्थापन करण्याचा ठराव मंजूर करून प्रत्यक्षात मात्र कंपनी स्थापन करण्याचा प्रकार सत्तारूढ भाजपाने केला.

ruckus in Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ

नाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ

नाशिक - महापालिकेच्या महासभेत शहर बस वाहतुकीसाठी परिवहन समिती स्थापन करण्याचा ठराव मंजूर करून प्रत्यक्षात मात्र कंपनी स्थापन करण्याचा प्रकार सत्तारूढ भाजपाने केला. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या महासभेत प्रचंड गोंधळ विरोधकांनी घातला. त्यामुळे भाजपच्या महापौर रंजना भानसी यांनी महासभा गुंडाळली.

दरम्यान विरोधकांनी प्रति महासभा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मॅनेज झाले आणि महासभेत जाणीवपूर्वक गोंधळ घातला असा आरोप काँग्रेसच्या नगरसेविका डॉ हेमलता पाटील यांनी केला आणि त्यामुळे प्रति महासभेत गोंधळ झाला आणि ही सभाही गोंधळात उरकली गेली.

Web Title: ruckus in Nashik Municipal Corporation

टॅग्स :Nashikनाशिक