शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

आरटीई प्रवेशाला पुन्हा मुदत वाढ ; अजूनही दहा हजार विद्यार्थी प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 17:18 IST

आरटीई प्रवेशासाठी दुसरी सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत (दि.२७) दिलेली मुदत शनिवारपर्यंत (दि.२९) वाढविण्यात आली असून, दुसऱ्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळूनही प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे. मात्र प्राथमिक शाळा सुरु होऊन पंधरवडा उलटूनही आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरुच असून अजूनही दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना  तिसऱ्या सोडतीची प्रतिक्षा आहे

ठळक मुद्देआरटीईच्या दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी मुदतवाढशाळा सुरू होऊन पंधरवडा उलटूनही प्रवेश प्रक्रिया सुरुच प्रवेशप्रक्रियेतील उशीरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

नाशिक : आरटीई प्रवेशासाठी दुसरी सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत (दि.२७) दिलेली मुदत शनिवारपर्यंत (दि.२९) वाढविण्यात आली असून, दुसऱ्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळूनही प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे. मात्र प्राथमिक शाळा सुरु होऊन पंधरवडा उलटूनही आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरुच असून अजूनही दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना  तिसऱ्या सोडतीची प्रतिक्षा आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार केव्हा असा प्रश्न निर्माण झाला असून उशीरा प्रवेश मिळल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.  आरटीईच्या दुसºया सोडतीत ३६५ शाळांत दोन हजार ३७ मुलांची निवड झाली असून, आतापर्यंत केवळ एक हजार ५९ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अजूनही सुमारे नऊशे विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकलेले नाही. त्यामुळे पालकांना पडताळणी समितीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शनिवारपर्यंत (दि.२९) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना एसएमएसद्वारे सोडतीची माहिती पाठविण्यात आली असून, आरटीईच्या  संकेतस्थळावर लॉगइन करून अ‍ॅप्लिकेशन व्हाइज डिटेल्सयावर क्लिक करून अर्जक्रमांक टाकून पालकांना आपल्या अर्जाची स्थिती माहीत करून घेता येणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या अर्जाची स्थिती माहीत करून घेत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या  २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. दरवर्षी डिसेंबरमध्ये सुरू होणारी ही प्रक्रिया यंदा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरू असून,  एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पहिली सोडत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिने झाल्यानंतर अखेर दुसरी सोडत जाहीर झाली आहे. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश घेण्यास दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर दुसऱ्या सोडतीतील प्रवेशांसाठी पहिल्यांदा मुदत वाढ दिली आहे. याप्रक्रियेत आतापर्यंत दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटल्याने अद्याप प्रवेशाची संधी न मिळालेले सुमारे दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे पालक तिसऱ्या सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकRight To Educationशिक्षण हक्क कायदाSchoolशाळाStudentविद्यार्थी