नाशकात ४४६ शाळांमधील ५ हजार ५४६ जागांसाठी आरटीई अर्जप्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 09:46 PM2020-02-11T21:46:23+5:302020-02-11T21:50:25+5:30

आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी बुधवार (दि.१२)पासून अर्ज करण्याची संधी पालकांना उपलब्ध होणार आहे. आरटीई प्रक्रियेत आतापर्यंत नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील ४४६ शाळांमध्ये ५ हजार ५४६ जागा उपलब्ध आहे.

RTE application process for 3 thousand 5 seats in 3 schools in Nashik | नाशकात ४४६ शाळांमधील ५ हजार ५४६ जागांसाठी आरटीई अर्जप्रक्रिया

नाशकात ४४६ शाळांमधील ५ हजार ५४६ जागांसाठी आरटीई अर्जप्रक्रिया

Next
ठळक मुद्दे12 ते 29 फेब्रुवारीदरम्यान आरटीईसाठी अर्ज करण्याची संधी नाशिक जिल्ह्यातील 446 शाळांमध्ये 5546 जागा

नाशिक : समाजातील आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी बुधवार (दि.१२)पासून अर्ज करण्याची संधी पालकांना उपलब्ध होणार आहे. आरटीई प्रक्रियेत आतापर्यंत नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील ४४६ शाळांमध्ये ५ हजार ५४६ जागा उपलब्ध आहे. या राखीव जागांवर प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलसह मोबाईल अ‍ॅपची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
शैक्षणिक वर्ष २०१९-२०ची आरटीई प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्यासाठी  २९ फेब्रुवारीपर्यंत आरटीई संकेतस्थळावरसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत सहभागी होताना पालकांना आरटीई पोर्टलवर सुरुवातीला पाल्याची जन्मतारीख व नावासह मूळ माहिती अद्यावत करून नोंदणी करून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवावा लागणार आहे. आॅनलाइन अर्ज भरताना पालक व त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून १ व ३ किमी आणि अधिक अंतरा पर्यंतच्या उपलब्ध असणाºया फक्त १० शाळांचे पर्याय निवडण्याचे स्वांतत्र आहे. आरटीईच्या संकेतस्थळावर एका विद्यार्थ्यांसाठी एकच अर्ज करता येणार असून पालकांना  मदत केंद्र, सायबर कॅफे अथवा मोबाइलवर आरटीईचे अ‍ॅप डाऊनलोड करून अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र अपलोड करावयाचे नाहीत. मात्र, रहिवासाचा पत्ता असणारा पुरावा, बालकाचे जन्म दिनांकांची नोंद करण्यासाठी जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास आर्थिक वर्ष २०१७-१८/२०१८-१९ या  वषार्चा उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रांचे संकलन आवश्यक असून आरटीईच्या सोडतीत नाव आल्यानंतर ही सर्व कागदपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे अनिवार्य असणार आहे. 
 

Web Title: RTE application process for 3 thousand 5 seats in 3 schools in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.