शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

फेब्रुवारीपासून सुरू होणार आरटीई प्रवेश प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 7:20 PM

शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू होणार आहेत. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील विविध ४६६ शाळांमध्ये ६५८९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी प्राप्त ११ हजार ११८ अर्जांपैकी चार प्रवेश फेºयांमध्ये ७ हजार १०८ बालकांची लॉटरी लागली होती. यातील ४ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. 

ठळक मुद्देआरटीई प्रवेश प्रक्रियेला फेब्रुवारीपासून सुरुवात शिक्षण विभागाकडून आवश्यक कागदपत्र उपलब्ध करण्याचे आवाहन

नाशिक: शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू होणार आहेत. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील विविध ४६६ शाळांमध्ये ६५८९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी प्राप्त ११ हजार ११८ अर्जांपैकी चार प्रवेश फेºयांमध्ये ७ हजार १०८ बालकांची लॉटरी लागली होती. यातील ४ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. शैक्षणिक वर्ष २०१९-२० करीता लवकरच आॅनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, पालकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाºया विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांचे वय ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत  नर्सरीसाठी ३ वर्ष पूर्ण व पहिलीसाठी ६ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रकियेविषयी व्हॉट्स अ‍ॅप/फेसबुक यांसारख्या सोशल मीडियामध्ये येणाºया पोस्टवर विश्वास न ठेवता १३ी25ंे्रि२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणारे वेळापत्रक व सूचनांप्रमाणे अर्ज प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे. दरम्यान, २०१९-२०  शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेसाठी नवीन शासन निर्णय निर्गमित होणार असून त्यानंतर शिक्षण विभागाकडून अद्यावत माहिती दिली जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रेरहिवासी पत्त्याचा पुरावा व जन्मतारीख दाखला यासोबत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वडील किंवा विद्यार्थी यांचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर खुल्या गटातील विद्यार्थ्यांना पत्त्याच्या पुरावा व जन्मतारीख दाखला यासोबतच वर्ष १७-१८ चा १ लाखांपेक्षा कमी उत्पन्न दाखला आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना पत्त्याचा पुरावा व जन्मतारीख दाखला यासोबतच सिव्हिल सर्जन यांचा दाखला आवश्यक आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थीSchoolशाळा