पिकांची फेरपालट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:50 IST2021-01-29T21:17:47+5:302021-01-30T00:50:29+5:30

निफाड : गव्हावर काही रोग जमिनीतून येतात, त्यामुळे पिकांची फेरपालट करा. कृषी विद्यापीठाने संशोधन करुन तयार केलेल्या व सरकारमान्य तांबेरा प्रतिकारक्षम गहू बियाणांचा वापर करावा असे आवाहन गहू रोग शास्त्रज्ञ भानुदास गमे यांनी केले.

Rotate crops | पिकांची फेरपालट करा

पिकांची फेरपालट करा

ठळक मुद्देभानुदास गमे : निफाडला कृषी महोत्सव साजरा

दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास मार्ग , अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास केंद्र निफाड अंतर्गत कृषी शास्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व निफाड विविध कार्यकारी सह सोसायटी यांच्या सहकार्याने निफाड येथे कृषी महोत्सवात गमे बोलत होते. अध्यक्षस्थानी निफाड वि. का. सह सोसायटीचे अध्यक्ष रमेश जाधव होते याप्रसंगी व्यासपीठावर गहू विशेष शास्त्रज्ञ सुरेश दोडके , ओम गायत्री फूड प्रोसेसर कंपनीचे अध्यक्ष मधुकर गवळी, श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास केंद्राचे प्रमुख वि.दा.व्यवहारे , गहू रोग शास्त्रज्ञ भानुदास गमे, गहू कीटक शास्त्रज्ञ भालचंद्र म्हस्के , राजेंद्र राठी, नितीन पांनगव्हाणे , अनिल कुंदे, जगन्नाथ खापरे, निफाड वि. का. सह सोसायटीचे अध्यक्ष रमेश जाधव, सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब कुंदे, भाऊसाहेब कापसे, शिवाजी ढेपले, आसिफ पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवाचे उद‌्घाटन सुरेश घोडके यांनी केले. प्रास्तविक निफाड येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्राचे प्रमुख वि. दा. व्यवहारे यांनी केले.
याप्रसंगी गहू विशेष शास्त्रज्ञ सुरेश दोडके,गहू कीटक शास्त्रज्ञ भालचंद्र म्हस्के, राजेंद्र राठी , मधुकर गवळी, नितीन पानगव्हाणे यांची व्याख्याने झाली. सुत्रसंचलन सुभाष खाटेकर यांनी तर आभार प्रदर्शन जगदीश बागडे यांनी केले.

Web Title: Rotate crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.