सटाणा शहरात रोटरी, इनरव्हील क्लब पदग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:30 IST2020-07-08T21:07:56+5:302020-07-09T00:30:51+5:30
सटाणा : रोटरी क्लब आॅफ सटाणा मिडटाऊन आणि इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाऊन यांचा पदग्रहण सोहळा नुकताच येथील वाणी मंगल कार्यालयात प्रशासनाचे नियम पाळून संपन्न झाला.

सटाणा शहरात रोटरी, इनरव्हील क्लब पदग्रहण
सटाणा : रोटरी क्लब आॅफ सटाणा मिडटाऊन आणि इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाऊन यांचा पदग्रहण सोहळा नुकताच येथील वाणी मंगल कार्यालयात प्रशासनाचे नियम पाळून संपन्न झाला. कार्यक्रमासाठी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, श्रीधर कोठावदे, भिकाशेठ जाधव, पंडित भदाणे, जितेंद्र कापडणे, किशोर कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोटरी क्लब आॅफ सटाणा मिडटाऊनच्या नूतन अध्यक्ष विद्या अमृतकर यांनी मावळते अध्यक्ष सचिन दशपुते यांच्याकडून पदभार स्वीकारला तसेच अॅड. अभिमन्यू पाटील यांनी सेक्रेटरीपदाची सूत्रे स्वीकारली. इनरव्हील क्लबच्या नूतन अध्यक्ष रूपाली जाधव यांनी मावळत्या अध्यक्ष स्मिता येवला यांच्याकडून पदभार स्वीकारला तसेच साधना पाटील यांनी सेक्रेटरीपदाची सूत्रे स्वीकारली. ट्रेझरर नयना कोठावदे, पूनम अंधारे, रेखा वाघ, मीनाक्षी जाधव तसेच व्हाइस प्रेसिडेंट संगीता खानकरी यांनी आपल्या पदांची जबाबदारी स्वीकारली. याप्रसंगी रूपाली निकुंभ, सरला अमृतकर, सुजाता पाठक, रंजिता मोरे, नेहा जगताप, यशवंत अमृतकर, राहुल जाधव, जगदीश मुंडावरे, विवेक जगताप, अमोल अंधारे, प्रकाश सोनग्रा, संजय नेरकर, मनोज येवला क्लब सभासद उपस्थित होते. यावेळी दुर्गवीर रोहित जाधव यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन महाजन व रूपाली कोठावदे यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड.अभिमन्यू पाटील यांनी केले.