शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

रोल मॉडेल : कालव्यांना त्वरित पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

By admin | Updated: April 2, 2016 00:08 IST

वाघाडचे राखीव पाणी सोडत नसल्याने संताप

दिंडोरी : शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालविलेला उपक्र म म्हणून जागतिक पातळीवर दखल घेतला गेलेला वाघाड सिंचन प्रकल्प सिंचन व्यवस्थापनेचे रोल मॉडेल म्हणून सांगितला जात आहे. समन्यायी पाणीवाटप, पीकस्वातंत्र्य, घनमापनपद्धतीने पाणीवाटप, टेल ते हेड सिंचन, श्रमदानाने कालवा दुरुस्ती, शंभर टक्के पाणीपट्टी वसुली, आगावू पाणीपट्टी भरणा, काटकसरीने पाणीवापर या सूत्रांचे कटाक्षाने पालन आणि पाणीवापर संस्थांचा पारदर्शक व्यवहार यामुळेच हा प्रकल्प नावारूपास आलेला असताना यंदा मात्र या पाणीवाटप संस्थेच्या हक्काचे पाणी शेतकऱ्यांना आश्वासन देऊनही सोडले जात नसल्याने पाणीवाटप संस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाघाड कालव्यांना त्वरित आवर्तन सोडावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाणीवाटप महासंघाच्या अध्यक्ष पार्वताबाई शिंदे, कार्याध्यक्ष रामनाथ वाबळे, उपाध्यक्ष सिंधूबाई नाठे, संस्थापक अध्यक्ष शहाजी सोमवंशी, संचालक चंद्रकांत राजे, माजी अध्यक्ष शिवाजी पिंगळ यांनी दिला आहे.वाघाड प्रकल्पअंतर्गत झालेल्या पाणी नियोजनात संस्थेने यंदा दुष्काळी परिस्थितीचा विचार करत जास्तीचे पाणी वाट्याला येत असताना कमी पाणी घेण्याचे मान्य करत नियोजन झाले. यानुसार पाणीवापर संस्था यांना शासनाने धरणात उपलब्ध झालेल्या पाण्याच्या प्रमाणात संस्थाना देय पाणी ६६० दलघफू कोट्यातून रब्बीचे ३०९ दलघफू पाणी घेतले तर उर्वरित ३५१ दलघफू पाणी शिल्लक असताना गेल्या दोन महिन्यापासून संस्थेच्या कार्यकारी मंडळाने विविध स्तरावर पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी, आयुक्त, अधीक्षक अभियंता यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करूनही पाणी देण्याबाबत तोंडी अश्वासन दिले. परंतु आजपर्यंत पाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने संभ्रम कायम ठेवला आहे. मध्यंतरी प्रशासनाने लोकप्रतिनिधी तसेच पाणीवापर संस्थांना विश्वासात न घेता वाघाड धरणातून अचानक पाणी पालखेड धरणात सोडले गेले. वरील सर्व संस्थांनी १० मार्च रोजी शांततेच्या मार्गाने धरणावर जाऊन आंदोलन करून नदीला सोडलेले पाणी बंद करून वाघाड धरण रिकामे करण्याचा प्रशासनाचा डाव हाणून पाडला. आज वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेच्या झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसा ठराव मुख्य अभियंता यांना पाठविण्यात आला आहे असे संस्थेच्या अध्यक्ष पार्वताबाई शिंदे, कार्याध्यक्ष रामनाथ वाबळे, उपअध्यक्षा सिंधूबाई नाठे, ताई वडजे, संचालक चंद्रकांत राजे, शिवाजी पिंगळ, शहाजी सोमवंशी, चंद्रकांत वाघ, भास्करराव गायकवाड, मधुकर पवार, तुषार वसाळ, सुरेश घुमरे, प्रभाकर विधाते, प्रकाश नाठे, पुंजा शिंदे, विजय वडजे, भरत कावळे, सचिव बाळासाहेब कदम आदि उपस्थित होते. (वार्ताहर)