Rohitra fire at Manori | मानोरी येथे रोहित्राला आग

मानोरी बु।। येथे शॉटसर्किटने लागलेल्या आगीने आकाशात पसरलेले धुराचे लोळ.

मानोरी : येथील साजदा शब्बीर शहा यांच्या शेतामध्ये असलेल्या रोहित्रात रविवारी (दि.२४) दुपारी अचानक शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सुमारे साडेसहा लाख रु पयांचे नुकसान झाले आहे.
दुपारी दोन वाजेच्या सुमारास वाऱ्याचा वेग वाढल्याने रोहित्राजवळील वीजतारांचे एकमेकांत घर्षण होऊन आग लागली. यात घराजवळ असलेले पाच लाख रुपयांचे सुमारे चार हजार क्रेट्स पंचवीस हजारांचे दहा पत्रे, जनरेटर तेसच पेरू आणि निंबाच्या १५ ते २० झाडे अशा एकूण साडेसहा लाख रु पयांचे नुकसान झाले. रोहित्राजवळ दोन ते तीन मोठमोठे स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. आग विझविण्यासाठी फिरोज शहा, संदीप शिंदे, अण्णा शिंदे, चांगदेव शेळके, रोशन वावधाने, गोटू शेळके, पंढरी तिपायले आदींनी प्रयत्न केले. सुमारे तासाभरात आग आटोक्यात आली.

 

 

Web Title: Rohitra fire at Manori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.