शस्त्रांचा धाक दाखवून मटका अड्ड्यावर लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:23 IST2019-08-10T00:03:41+5:302019-08-10T00:23:47+5:30
जेलरोड इंगळेनगर पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या मटक्याच्या अवैध धंद्यावर तोंडाला फडके बांधून आलेल्या चौघा लुटारूंनी बंदूक, कोयत्याचा धाक दाखवून लूट केल्याची घटना घडली आहे. शहरात अशाप्रकारे पहिल्यांदाच अवैध धंद्यावर झालेल्या लुटमारीच्या प्रकाराची चर्चा सुरू आहे.

शस्त्रांचा धाक दाखवून मटका अड्ड्यावर लूट
नाशिकरोड : जेलरोड इंगळेनगर पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या मटक्याच्या अवैध धंद्यावर तोंडाला फडके बांधून आलेल्या चौघा लुटारूंनी बंदूक, कोयत्याचा धाक दाखवून लूट केल्याची घटना घडली आहे. शहरात अशाप्रकारे पहिल्यांदाच अवैध धंद्यावर झालेल्या लुटमारीच्या प्रकाराची चर्चा सुरू आहे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील इंगळेनगर पाण्याच्या टाकी समोरील एका सोसायटीच्या नजीक अवैध मटक्याचा अड्डा सुरू होता. मटका अड्ड्यावर तोंडाला काळे कापड बांधून दुचाकीवरून आलेल्या चौघांनी शस्त्रांचा धाक दाखवून लूट केली. काही मिनिटांतच घडलेल्या घटनेमुळे मटका खेळण्यास आलेल्या जुगाऱ्यांमध्ये धावपळ उडाली. अवैध मटक्याच्या अड्ड्यालाच लुटारूंनी लुटल्याचे कळताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, लुटीच्या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. लुटारू विनानंबर प्लेटची दुचाकीवरून फरार झाल्याचे बघ्यांनी सांगितले. मात्र या घटनेला उपनगर पोलिसांनी दुजोरा दिला नाही.
किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण
नाशिकरोड : उपनगर येथे किरकोळ कारणावरून बहिणी व भावास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सचिन ओमचंद्र कागडा याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, घराजवळ बहीण वर्षा, दीपा, कविता या उभ्या होत्या. यावेळी शेजारी राहाणाºया अमन लोट, आकाश लोट, अन्नू रिडलॉन, संदेश रिडलॉन, संदेश रिडलॉन, सल्लू रिडलॉन व त्यांचे दोन-तीन सहकारी यांनी मागील भांडणाच्या कुरापतीवरून बहिणीला शिवीगाळ करत होते. दरम्यान, सचिन कागडा हा घरी आला असता संशयित युवकांनी सचिनला मारहाण केली.