चांदवड टोलनाक्यावर रस्ता सुरक्षा सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:14 IST2018-04-27T00:14:15+5:302018-04-27T00:14:15+5:30
चांदवड : मंगरूळ य्ेथील इरकॉन सोमा टोलवेज पथकर टोलनाक्यावर दि. २३ एप्रिल ते दि. ७ मे या कालावधीत २९ व्या रस्ता सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.

चांदवड टोलनाक्यावर रस्ता सुरक्षा सप्ताह
चांदवड : मंगरूळ य्ेथील इरकॉन सोमा टोलवेज पथकर टोलनाक्यावर दि. २३ एप्रिल ते दि. ७ मे या कालावधीत २९ व्या रस्ता सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मोहिते यांनी वाहनांचे अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे तर नशेत वाहने चालवून स्वत:च्या व इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू नये तर वाहनचालकांनी कागदपत्रे, वाहनपरवाना, वाहनाचा विमा कागदपत्रे स्वत:जवळ बाळगावी, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, अतिरिक्त भार असलेली वाहने चालवू नयेत. प्रवासी वाहतूक ठरवून दिलेल्या नियमानुसार करावी, रात्रीच्या वेळी वाहने स्पष्ट दिसावी म्हणून वाहनांना रिफ्लेक्टर लावावेत, शाळा, महाविद्यालये, दवाखाने यांच्यासमोरून वाहने नेताना हॉर्न वाजवू नये तर नवीन वाहनांची नोंदणी करून विमा काढावा आदी सूचना मोहिते यांनी दिल्यात. यावेळी पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, उपनिरीक्षक रामचंद्र जगताप, वाहतूक शाखेचे पोलीस मुज्जमिल देशमुख, योगेश हेबांडे, आर.बी. बिन्नर , अमित सानप, चंद्रकांत निकम, नरेंद्र सौंदाणे, सागर शेवाळे, मंगेश डोंगरे, आयएसटीपीएल व्यवस्थापक के. व्ही. सुरेश, प्लाझा मॅनेजर पंकज झवर, अपघात विभागप्रमुख रामेश्वर भावसार, भाऊसाहेब धाकराव, टोल प्लाझाचे सहायक व्यवस्थापक सुहास कापडणी, प्रशांत ठाकरे आदी उपस्थित होेते.
यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे बसचालक, वाहक, वाहनचालकांना पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, उपनिरीक्षक कैलास चौधरी, रामचंद्र जगताप व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत केले तर नियमांच्या पत्रकांचे वाटप करण्यात आले. तर वाहनांवर रिफ्लेक्टर लावून सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशांत ठाकरे यांनी केले. तर स्वागत सुहास कापडणी यांनी केले. या सप्ताह कालावधीत चांदवड टोल प्लाझावर विविध उपक्रमांचे आयोजन केले असल्याचे सांगण्यात आले.