शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

शेतकरी, कामगारांनी रोखला रस्ता; नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर तासभर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 1:37 PM

नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतुक सातपूरकडून गिरणारेमार्गे वळविण्यात आली होती. तसेच नाशिककडे येणारी वाहतुक त्र्यंबकरोडवरून पहिने-पेगलवाडीजवळून रोहिलेमार्गे रवाना करण्यात आली.

ठळक मुद्देवाहतुक ठप्पवाट अडवून जोरदार घोषणाबाजी

नाशिक : केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी कायदे, प्रस्तावित वीज विधेयक रद्द करावे, गरजु कुटुंबाला सहा महिने दरडोई १० किलो धान्य मोफत द्यावे, कोरोनापासून सुटका करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करावी विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नाशिक तालुका कमिटी, अखिल भारतीय किसान सभेने एल्गार पुकारला. गुरुवारी (दि.२६) लाल बावटे घेत शेतकरी, कामगार घटकातील आंदोलकांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता दुतर्फा रोखून धरला.भाजपा सरकारच्या शेतकरी-कामगारविरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी रास्ता रोकोची हाक देण्यात आली होती. कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने पुकारलेल्या या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद लाभला. केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी करत आंदोलकांनी महिरावणी गावाजवळील चौफुलीवर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास रास्ता रोको सुरु केला. त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या दुतर्फा आंदोलकांनी ठिय्या मांडल्यामुळे नाशिक-त्र्यंबक-नाशिक या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतुक सातपूरकडून गिरणारेमार्गे वळविण्यात आली होती. तसेच नाशिककडे येणारी वाहतुक त्र्यंबकरोडवरून पहिने-पेगलवाडीजवळून रोहिलेमार्गे रवाना करण्यात आली. सुमारे तासभर आंदोलकांनी वाट अडवून जोरदार घोषणाबाजी केली. तासाभरानंतर पोलिसांनी मात्र आंदोलकांना त्वरित हटविण्यास सुरुवात करत वाहतूक सुरळीत केली.

...अशा आहेत मागण्यावनाधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा.औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिक बेरोजगार तरुण-तरुणींना ८० टक्के प्राधान्य द्या.लॉकडाऊन काळातील वीजबीले पुर्णपणे माफ करा.दारिद्य्ररेषेखालील प्रत्येक कुटुंबाला केसरी कार्डऐवजी पिवळे रेशनकार्ड द्या.ऑनलाइन शिक्षणपध्दती बंद करा.प्रस्तावित जनविरोधी प्रकल्प रद्द करा 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरNashikनाशिकFarmerशेतकरीStrikeसंप