शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांची झाली चाळण!

By admin | Updated: July 29, 2014 00:53 IST

खड्डेच खड्डे : शहर चाललेय खड्ड्यात

नाशिक : पावसाळा आला की खड्डे पडणारच हे समीकरण नाशिकमध्ये सुरू झाले असून, गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करावा लागत आहे. यंदाही रस्त्याची चाळण होण्यास सुरुवात झाली आहे. अगोदच रिलायन्सने खोदलेले खड्डे आणि त्यात पावसाने खोदलेले खड्डे यामुळे यंदा विक्रमी खर्च होण्याची शक्यता आहे.गेल्या काही वर्षांत शहरातील खड्डे हे मुंबईच्या खड्ड्यांच्या संख्येशी स्पर्धा करीत आहेत. पावसाळ्यात अशा प्रकारे खड्डे तयार झाल्यानंतर त्यामुळे अपघात होतात; परंतु अनेक जण जायबंदीदेखील झाले आहेत. महापालिका खड्डे बुजवल्याचा दावा करीत असली, तरी प्रत्यक्षात मात्र एका ठिकाणचा बुजवला की दुसऱ्या ठिकाणी खड्डे तयार होतात. यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महापालिकेने साडेतीन हजार खड्डे आणि ओघळ्या बुजवल्याचा दावा केला. साडेसातशे खड्डेच बुजवणे बाकी असल्याचे नमूद केले. परंतु पाऊस वाढला आणि रस्त्यांची चाळण झाली आहे.दर तीन वर्षांनी रस्त्यांवर डांबराचे अस्तरीकरण करणे अपेक्षित आहे. परंतु तसे न होत नाही, असा पालिकेचा दावा आहे. तथापि, अनेक ठिकाणी नव्याने झालेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेचे पितळ उघडे पडले आहे. साहजिकच खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)