रिक्षा उलटून लोहोणेर येथील महिला ठार

By Admin | Updated: September 8, 2016 00:58 IST2016-09-08T00:58:24+5:302016-09-08T00:58:34+5:30

रिक्षा उलटून लोहोणेर येथील महिला ठार

Rickshaw reversed the women in Lohorer | रिक्षा उलटून लोहोणेर येथील महिला ठार

रिक्षा उलटून लोहोणेर येथील महिला ठार

लोहोणेर : येथील महिला भाविक
ऋषीपंचमी दिवशी दर्शन घेऊन परतीचा प्रवास करताना बोरगांव जवळील गायदर घाटात अ‍ॅपे रिक्षाचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने घडलेल्या अपघातात येथील अलकाबाई दयाराम खेरणार ही महिला ठार झाली असून इतर महिला जखमी झाल्या आहेत.
लोहोणेर येथील काही महिला
ऋषीपंचमीच्या दिवशी कळवण तालुक्यातील सिद्धेश्वर येथील महादेव मंदिरात अ‍ॅपे रिक्षाने (क्र मांक एम. एच. ३८ - २३२०) गेल्या होत्या. सिद्धेश्वर येथील दर्शन घेऊन या महिला गुजरात राज्यातील सातपुरा येथे गेल्या होत्या. तेथून परतीचा प्रवास करीत असताना बोरगांव जवळील गायदर घाटात सदर रिक्शाचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात गाडीतील सर्व महिला भाविकांसह ३ बालके व चालक जखमी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती कि ेरिक्षाने तीन पलटी घेतल्या अपघातात लोहोणेर येथील अलकाबाई खैरणार
(४५) यांना नाशिक येथे घेउन जात असताना रस्त्यात त्यांचे निधन झाले. जखमींमध्ये संदीप अहिरे (३५), रेखा जेजुरकर (२६), निर्मला सूर्यवंशी (५०), नर्मदा खैरनार (५५), शैला खैरनार (५०), जनाबाई बच्छाव (५०), केतन आहिरे (८),वैष्णवी जेजुरकर (८), सुमनबाई पवार (६५), रेखा अहिरे (६२), अनिता जेजुरकर (३५) यांचा समावेश आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Rickshaw reversed the women in Lohorer