मुजोर रीक्षाचालकाची मुंबईच्या प्रवाशांना मारहाण

By नामदेव भोर | Updated: June 9, 2023 15:59 IST2023-06-09T15:58:59+5:302023-06-09T15:59:27+5:30

मेहेंदळे यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार सांगत तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी रीक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

rickshaw puller beat Mumbai passengers in nashik | मुजोर रीक्षाचालकाची मुंबईच्या प्रवाशांना मारहाण

मुजोर रीक्षाचालकाची मुंबईच्या प्रवाशांना मारहाण

नाशिक : द्वारका परिसरातील आई हॉटेलसमोर एका अनोळखी मूजोर रीक्षाचालकाने मुंबईतील प्रवाशांसोबत भाड्यावरून वाद घालत टवाळखोर मंडळी जमवून प्रवाशांना मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका परिसरातील आई हॉटेलसमोर मुंबईहून नाशिकला आलेले नानाजी गंगाधर मेहेंदळे ४४, बाजी प्रभूचाळ, नरसी पाडा, हनुमाननगर, कांदिवली) हे अनोळखी रीक्षा चालकासोबत भाडे ठरवत असताना मूजोर रीक्षा चालकाने त्यांच्याकडे अव्वाच्या सव्वा भाडे मागणी केल्यावरून त्यांच्यात वाद झाले. यावेळी रीक्षाचालकाने त्याचे टवाळखोर साथीदार बोलावून महेंदळे व त्यांच्यासोबत असलेले प्रकाश नामदेव अहिरे(४१, रा. नायगाव ईस्ट,ता. वसई) यांना मारहाण करून दमबाजी आणि शिवीगाळ केली. त्यामुळे मेहेंदळे यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार सांगत तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी रीक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: rickshaw puller beat Mumbai passengers in nashik