पेट्रोलच्या भडक्यात रिक्षाचालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:01 IST2019-07-12T00:59:58+5:302019-07-12T01:01:03+5:30
अॅटोरिक्षा दुरुस्ती करीत असताना बिडी पेटविल्याने पेट्रोलचा भडका होऊन रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना जुने नाशिक येथील पिंजारघाट भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पेट्रोलच्या भडक्यात रिक्षाचालक ठार
नाशिक : अॅटोरिक्षा दुरुस्ती करीत असताना बिडी पेटविल्याने पेट्रोलचा भडका होऊन रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना जुने नाशिक येथील पिंजारघाट भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिया अब्दूल हमीद अन्सारी (५०) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. जिया अन्सारी सोमवारी दुपारी आपल्या घरासमोर रिक्षा खोलून दुरुस्ती करीत होते. कार्बोरेटर पेट्रोलने धुवून ते बिडी पेटवित असताना ही घटना घडली. बिडी पेटवित असताना अचानक कार्बोरेटरसह कपड्यांनी पेट घेतला. या भडक्यात ते ७३ टक्के भाजले. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार पाळदे करीत आहेत.