प्रेमास नकार देणाऱ्या मुलीस रिक्षाचालकाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:12 IST2018-09-23T01:12:07+5:302018-09-23T01:12:24+5:30

प्रेमास नकार देणाºया अल्पवयीन मुलीस रिक्षाचालकाने बळजबरीने रिक्षात बसण्यास सांगितले़ मात्र, त्यास नकार देताच तिचा विनयभंग करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़२१) सायंकाळी पंचवटीतील दिंडोरी नाक्यावर घडली़

 Rickshaw driver beaten by a girl who refused to love | प्रेमास नकार देणाऱ्या मुलीस रिक्षाचालकाची मारहाण

प्रेमास नकार देणाऱ्या मुलीस रिक्षाचालकाची मारहाण

नाशिक : प्रेमास नकार देणाºया अल्पवयीन मुलीस रिक्षाचालकाने बळजबरीने रिक्षात बसण्यास सांगितले़ मात्र, त्यास नकार देताच तिचा विनयभंग करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़२१) सायंकाळी पंचवटीतील दिंडोरी नाक्यावर घडली़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळच्या वृंदावननगर परिसरातील सोळा वर्षीय मुलगी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी दिंडोरी नाक्यावरील रिक्षा स्टॅण्डवर उभी होती़ यावेळी संशयित संदीप बेद (रा. पंचशील कॉलनी, मेरी, पंचवटी) हा रिक्षा घेऊन आला व ‘माझे तुज्यावर प्रेम आहे, ते कबूल कर, तुला रिक्षातून फुकट सोडत जाईन, चल रिक्षात बस,’असे म्हटले; मात्र मुलीने नकार दिला असता संशयित बेदने ‘रिक्षात बस, नाही तर तुझ्या घरी दोघांचे प्रेमसंबंध आहेत, असे खोटे सांगून तुझी बदनामी करील असे म्हटले. त्यावेळी मुलीने ‘तुला काय करायचे ते कर, मी रिक्षात बसणार नाही’ असे म्हटल्यावर त्याने रिक्षातून खाली उतरत तिचा विनयभंग करून मारहाण केली़  याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी रिक्षाचालक संदीप बेदविरोधात विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़

Web Title:  Rickshaw driver beaten by a girl who refused to love