विधानसभा उपाध्यक्षांनी घेतला पेठला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:06 IST2020-04-13T22:26:16+5:302020-04-13T23:06:50+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय उपाययोजना व खबरदारीचा उपाय म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पेठ तालुक्याचा दौरा करून पाहणी केली.

पेठ ग्रामीण रु ग्णालयाची पाहणी करताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ. समवेत भास्कर गावीत, नामदेव हलकंदर, गौरव गावीत आदी.
पेठ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय उपाययोजना व खबरदारीचा उपाय म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पेठ तालुक्याचा दौरा करून पाहणी केली.
दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे नरहरी झिरवाळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांनी पेठ तालुक्याला भेट दिली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेशी चर्चा करून पेठ येथील ग्रामीण रु ग्णालयास भेट देऊन संभाव्य व्यवस्थेची पाहणी केली. वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी कर्मचारी, औषध पुरवठा, वाहने, आरोग्यविषयक साहित्य या संदर्भात चर्चा करून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी तहसीलदार संदीप भोसले, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत आदी उपस्थित होते.