पिंपळगाव पोलीस ठाण्यात आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 01:02 IST2020-11-28T18:23:27+5:302020-11-29T01:02:10+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरातील पोलीस ठाण्यात विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची विभागातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक शनिवारी (दि. २८) संपन्न झाली.

पिंपळगाव पोलीस ठाण्यात पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांचे स्वागत करताना परिसरातील शेतकरी. समेवत पोलीस अधिकारी आदी.
पिंपळगाव बसवंत : शहरातील पोलीस ठाण्यात विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची विभागातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक शनिवारी (दि. २८) संपन्न झाली.
या बैठकीत पेंडिंग असलेल्या गुन्हे निकाली काढण्याबरोबरच पोलीस ठाणेहद्दीत फसवणूक झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांची माहिती घेण्यात आली. तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्षांनुवर्षे गुन्ह्यातील अस्ताव्यस्त पडलेल्या जुन्या गाड्याचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना दिघावकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी या बैठकीत सचिन पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावरकर, निफाडचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, ओझरचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पिंपळगाव पोलीस निरीक्षक संजय महाजन, निफाडचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप, पिंपळगावचे सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक पाटील, वावीचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, सायखेडाचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, वडणेर भैरवचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव आदी उपस्थित होते.
चौकट ...
परिसरातील शेतकऱ्यांनी केले स्वागत
पिंपळगाव बसवंत शहरात पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले. शेतकऱ्याचा स्वागत, सत्काराचा स्वीकार करत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे दाखवून दिले. यावेळी शेतकरी देवेंद्र काजळे, उद्धव शिंदे, लहू गवळी, संजय मिंधे, सतीश बनकर, संतोष वराडे, सुरेश हेमाले, मनोज मोरे, सतीश आरगडे, परसराम पवार, सुरेश साळुंके, अशोक बनकर, सुभाष विधाते, रमेश गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते.