शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण तालुका ग्रामसेवकांची आढावा बैठक

By admin | Updated: August 4, 2014 00:57 IST

बागलाण तालुका ग्रामसेवकांची आढावा बैठक

सटाणा : १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत शासकीय योजना व नवीन योजनेमार्फत प्रत्येक गावागावात विकासकामांचा ठराव मंजूर करून घ्यावेत, असे आवाहन सभापती गीता सोनवणे यांनी आयोजित ग्रामसेवकांच्या बैठकीत केले. बागलाण पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. अध्यस्थानी सभापती गीता सोनवणे होते. यावेळी जि. प. सदस्य सुनीता पाटील, उपसभापती मायावती धिवरे, पंचायत समिती सदस्य परशुराम अहिरे, विरेश घोडे, सतीश विसपुते, लक्ष्मण सोनवणे, रेखा ठाकरे, अहल्याबाई माळी, रखमाबाई सोनवणे, जिजाबाई सोनवणे, सोमनाथ सूर्यवंशी, गटविकास अधिकारी महेंद्र कोर उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायतींचा वर्गनिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत सीमेंट रस्ते, इंदिरा आवास घरकुल योजना, सर्वशिक्षा अभियानअंतर्गत बांधकामे, तेरावा वित्त आयोगाची कामे या कामांचा आढावा, ग्रामपंचायत बांधकामांचे माहिती, वृक्ष लागवड आदि विषयांवर आढावा घेण्यात येऊन अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे सूचनादेखील ग्रामसेवकांना देण्यात आले.रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील विहिरीचे कामे पूर्ण झालेली असून, त्यांची बिले अदा करण्यात आलेली नसल्याने आदिवासी भागातील जनता पंचायत समिती कार्यालयात येत असताना त्यांना उडवा उडवीचे उत्तरे मिळत असल्याने पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी यांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतीच्या कामांच्या शुभारंभप्रसंगी सदस्यांना निमंत्रित केले जात नसल्याची खंत मनसेचे सदस्य सतीश विसपुते यांनी व्यक्त केली.या आढावा बैठकीस अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी थोरात यांनी, तर सूत्रसंचालन विस्तार अधिकारी रामकृष्ण खैरणार यांनी केले.