शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर महसूल अधिकारी नाराज

By admin | Updated: January 31, 2016 00:09 IST

संघटना सक्रिय : शासकीय कामकाजावर परिणाम शक्य

नाशिक : जिल्हाधिकारी चांगले काम करतात, खालचे अधिकारी लक्ष घालीत नाहीत, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनाच सर्व अधिकार देण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य महसूल अधिकाऱ्यांना चांगलेच झोंबले असून, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम खालचे अधिकारीच करतात, जिल्हाधिकारी नव्हे असा युक्तिवाद करून यासंदर्भात महसूल अधिकारी संघटना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सक्रिय झाली आहे. शनिवारी यासंदर्भात सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करीत अनेक संदेश व्हायरल झाले आहेत. पुणे येथे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय बैठकीचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करून मुख्यमंत्र्यांनी खालच्या अधिकाऱ्यांना म्हणजेच तलाठी ते अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजावर अप्रत्यक्ष अविश्वासच व्यक्त केल्याची भावना बोलून दाखविली जात आहे. मुळात जिल्हाधिकाऱ्यांकडे फक्त नियंत्रणाची व देखरेखीची महत्त्वाची जबाबदारी असून, हाताखालचे अधिकारीच शासकीय योजना व कामांचा सातत्याने पाठपुरावा व प्रत्यक्ष योजनापूर्ती करीत असतात. अनेक जिल्हाधिकाऱ्यांना तर त्या त्या विषयांचे पुरेसे ज्ञानही नसते. अशा परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनाच चांगल्या कामाचे सारे श्रेय देणे म्हणजे अन्य यंत्रणा कामचुकार असल्याचा निष्कर्ष काढण्यासारखे होईल, अशी प्रतिक्रिया महसूल अधिकारी देऊ लागले आहेत. एकटे जिल्हाधिकारी काहीच करू शकत नाही, त्यांच्या मर्यादा शासनालाही ठाऊक आहेत किंबहुना तसा प्रयत्न करून पाहावा, अशी आव्हानाची भाषाही अधिकारी बोलू लागले आहेत. (प्रतिनिधी)