लासलगाव येथे शेतकऱ्यांसाठी भोजनालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:25 IST2020-06-18T22:22:35+5:302020-06-19T00:25:21+5:30

लासलगाव : येथील बाजार समितीच्या आवारात बाजार समितीने शेतकरी बांधवांसाठी भोजनालय सुरू केल्याची माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

Restaurant for farmers at Lasalgaon | लासलगाव येथे शेतकऱ्यांसाठी भोजनालय

लासलगाव शेतकरी भोजनालयाच्या उद्घाटनप्रसंगी दीपक पाटील, सुवर्णा जगताप, प्रीती बोरगुडे, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, शिवनाथ जाधव, रमेश पालवे, डी. के. जगताप आदी.

ठळक मुद्देबाजार समितीने अल्प दरात भोजनालय सुरू केले

लासलगाव : येथील बाजार समितीच्या आवारात बाजार समितीने शेतकरी बांधवांसाठी भोजनालय सुरू केल्याची माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.
बाजार आवारावर शेतमाल विक्रीस येणारे शेतकरी, व्यापारी, कामगार व इतर मार्केट घटक यांची चहा-पाणी, नाश्ता व जेवणाची सोय व्हावी यासाठी बाजार समितीने अल्प दरात भोजनालय सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन तहसीलदार दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसभापती प्रीती बोरगुडे, सदस्य पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, शिवनाथ जाधव, रमेश पालवे, जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप, नवनाथ बोरगुडे, तन्मय जगताप, नरेंद्र वाढवणे, सहायक सचिव सुदीन टर्ले, प्रकाश कुमावत, अशोक गायकवाड, सुनील डचके, सुरेश विखे, दत्तात्रय होळकर, पंकज होळकर, सुशील वाढवणे, संतोष पोटे, संदीप होळकर, संदीप निकम आदी उपस्थित होते.

Web Title: Restaurant for farmers at Lasalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.