शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी भागीदारीद्वारे घरकुल प्रस्तावाला प्रतिसाद

By admin | Updated: April 27, 2017 01:28 IST

नाशिक :प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा लाभ मिळविण्यासाठी ६७ अर्जांची विक्री झाली असली तरी आतापर्यंत १६ हजार ५९७ अर्ज प्राप्त झाले आहेत.

नाशिक : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या तीन घटकांमध्ये घरकुलांचा लाभ मिळविण्यासाठी ६७ अर्जांची विक्री झाली असली तरी आतापर्यंत १६ हजार ५९७ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याच्या प्रकारात सर्वाधिक ९५५० अर्ज महापालिकेकडे दाखल झाले आहेत.महापालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत झोपडपट्टीनिहाय सर्वेक्षण सुरू आहे. तत्पूर्वी, झोपडीधारक वगळता अन्य तीन प्रकारच्या घटकांसाठी महापालिकेने अर्ज मागविले होते. त्यात घटक क्रमांक २ मध्ये कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याकरिता सहाही विभाग मिळून ४३३७, घटक क्रमांक तीनमध्ये खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याकरिता ९५५० तर घटक क्रमांक ४ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थींद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यासाठी मिळणाऱ्या अनुदानाकरिता २७१० अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी दि. ३० एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत आणखी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने, खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याकरिता सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्यांचे कुटुंबांचे प्रति वर्ष उत्पन्न ३ लक्ष रुपयांपर्यंत असेल ते या घटकासाठी अर्ज करू शकतात. या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून १.५० लक्ष तर राज्य सरकारकडून १ लक्ष रुपये अनुदान प्राप्त होणार आहे. दरम्यान, झोपडपट्टीनिहाय सर्वेक्षण पश्चिम व सातपूर विभागात पूर्ण झाले असून, लवकरच अन्य विभागातही सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली. (प्रतिनिधी)