शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

रहिवासी छतावर; चोरटे घुसतात घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:18 AM

उन्हाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गरम होते. तसेच रात्रीच्या सुमारास घरात झोपही लागत नसल्याने सिडको भागातील बहुतांशी रहिवासी छतावर झोपतात. चोरटे याच संधीचा फायदा घेत मध्यरात्री घरात घुसून चोरी करीत असल्याचे प्रकार घडत आहेत.

सिडको : उन्हाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गरम होते. तसेच रात्रीच्या सुमारास घरात झोपही लागत नसल्याने सिडको भागातील बहुतांशी रहिवासी छतावर झोपतात. चोरटे याच संधीचा फायदा घेत मध्यरात्री घरात घुसून चोरी करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. मध्यरात्री चोरट्यांनी शिवशक्ती चौकातील बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यासंह पाऊण लाखाचा ऐवज लुटला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिडकोतील शिवशक्ती चौकात राहणारे संतोष पाटील हे बारा वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ६ वाजता झोपेतून उठून खाली आले असता चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून सुमारे पाऊण लाखाचा ऐवज लुटला. मागील आठवड्यात दि.१६ रोजी चोरट्यांनी घराच्या छतावर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व मोबाइलची चोरी केल्याचा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास सिडकोतील राणाप्रताप चौकात घडला होता. एकूणच उन्हामुळे घरात गरम होत असल्याने रहिवासी घराच्या छतावर झोपत असल्याने चोरटे मात्र याच संधीचा फायदा घेत घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास करण्याचे प्रकार घडत आहेत.लाखोंच्या साड्यांची चोरीसिडकोतील शिवशक्ती चौकातील रहिवासी रामसुख चौधरी यांचे साड्या विक्रीचे दुकान आहे. दुकानाच्या वरच त्यांचे निवासस्थान असून, गेल्या शुक्रवारी चौधरी यांनी रात्री १० वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. दुसºया दिवशी शनिवारी सकाळी चौधरी दुकान उघडण्यासाठी आले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून येवला पैठणी साड्यांचे बॉक्स, मंगल सुटिंगचे बॉक्स, चाळीस हजारांची रोकड तसेच सही केलेले दोन चेक व एटीएम कार्ड चोरी करून चोरट्यांनी पलायन केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस