पिंपळगाव येथे आरक्षण मेळावा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 00:50 IST2021-02-01T20:57:44+5:302021-02-02T00:50:07+5:30
पिंपळगाव बसवंत : जीएसटी, ऑनलाईन ट्रेडिंगमुळे छोट्या व्यापाऱ्यांची होणारी गळचेपी, आत्मनिर्भर भारत अभियान ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रामार्फत सरकारी नोकरीत व शिक्षणात फी सवलत यासाठी सवर्ण आरक्षणाचा १० टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गामधील मुला/मुलींसाठी लाभ कसा घ्यावा, याविषयी पिंपळगाव बसवंत येथे व्यापारी व सवर्ण आरक्षणाबाबत मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला.

याप्रसंगी कॅटचे राष्ट्रीय संघटन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इन्डस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जैनचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी आदींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश चिटणीस अल्पेश पारख, अल्पसंख्यांक युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल लोढा यांनी केले. यावेळी संघपती शांतिलाल चोरडिया, कांदा असोसिएशनचे अतुल शहा, शोभचंद पगारिया, मनोज सोनी, सुभाष धाडीवाल, महेश गांधी, राजू कोचर, चेतन मोरे, भरत सूर्यवंशी, अमोल कोल्हे, पगारिया वकील, गिरीश वर्मा, शैलेश बाफना आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.