नाळेगाव शिवारात शोधकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:13 IST2018-02-15T00:05:33+5:302018-02-15T00:13:06+5:30
दिंडोरी : तालुक्यातील आदिवासी पश्चिम भागातील नाळेगाव शिवारात बुधवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेपासून भारत सरकार पेट्रोलियम मंत्रालय व अल्फा जिओ इंडिया प्रा. लिमिटेडमार्फत पेट्रोलियम संशोधनाचे काम चालू आहे. सॅटेलाइटद्वारा जमिनीअंतर्गत डिझेल पेट्रोल असण्याची शक्यता असल्याने परिसरातील शेतजमिनीत १०० ते २०० फूट बोअरवेल करून त्यात १४ किलोचे सुरूंग सोडून स्फोट करण्यात आलले. बोअरवेलच्या बाजूला चौरस आकाराच छोटासा खड्डा करून त्यात सॅटेलाइट मशीनरीद्वारे जमिनीच्या अंतर्गत भागातील पाच किलोमीटरच्या परिसराचे संगणकाद्वारे फोटो घेण्यात आले. जमिनीच्या आतील भागात कुठे पेट्रोल-डिझलचा साठे मिळतात काय? याची चाचपणी केली जात आहे.

या कामासाठी शिवारात संशोधन करण्यासाठी संशोधन वाहन असून, त्यात स्वतंत्र संशोधन कक्ष आहे. एक संगणक चालक कार्यरत आहे. त्या संघणकाद्वारे घेतलेल्या बोअरवेल व बोअरवेलच्या आतील भागाचे एक्स-रे व नमुने घेतले जात आहेत. या कामाचे सरासरी संशोधन २०१९ ला होणार असल्याचे अल्फा जिओ इंडिया लिमिटेडच्या टीमने सांगितले. बोअरवेलच्या ट्रक, ट्रॅक्टर आदी पन्नास ते साठ वाहनांसोबत १३० ते १५० कर्मचारी नळवाडे शिवारात कार्यरत आहेत. परिसरात डिझल -पेट्रोलचा शोध लागतो की काय ?
याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.