शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक भारतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 5:08 PM

राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर  नोकरभरती करण्यासोबतच विना अनुदानित शिक्षकांना त्वरित अनुदान देणे, सर्व शिक्षकांना  जुनी पेंशन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, विना अट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्हा शिक्षक भारती, मुख्याध्यापक संघ व संयुक्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

ठळक मुद्देविना अनुदानित शिक्षकांना अनुदान देण्याची मागणी शिक्षकांना  जुनी पेंशन योजना लागू करावी नाशिक जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : राज्यातील शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर  नोकरभरती करण्यासोबतच विना अनुदानित शिक्षकांना त्वरित अनुदान देणे, सर्व शिक्षकांना  जुनी पेंशन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, विना अट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्हा शिक्षक भारती, मुख्याध्यापक संघ व संयुक्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील शिक्षकांच्या मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून राज्य सरकार शिक्षकांच्या मागण्यांकडे दुलक्ष करीत असल्याचा आरोप करीत नाशिक जिल्हा शिक्षक भारती, मुख्याध्यापक संघ व संयुक्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले.  राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर शिक्षकांची भरती करण्यासोबत खासगी क्षेत्रात अफेर मॅटिव्ह अ‍ॅक्शन कायदा लागू करावा, विना अनुदानित शिक्षकांना त्वरित अनुदान देणे, सर्व शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, विना अट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी, कला क्रीडा शिक्षक पुनर्स्थापना करणे, खाजगीकरण बंद करणे, पूर्णवेळ ग्रंथपाल नेमणे आदि मागण्यांही शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्या आहेत. शिक्षक भारतीच्या राज्य कार्यकारिणी ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाग देताना नासिक जिल्हा शिक्षक भारती, मुख्याध्यापक संघ व संयुक्त कृती समितीतर्फे नाशिक जिल्हाधिकारी कार्यलयात निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडेकर यांना शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष के. के. अहिरे,राज्य पदाधिकारी शेलार,विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे, सी. बी. पवार, जयवंत भाबड, चंद्रशेखर शेलार, कैलास पगार, प्रकल्प पाटील,पुष्पां गांगुर्डे,विजया पाटील आदि शिक्षक उपस्थित होते. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकcollectorजिल्हाधिकारी