शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जमीन अधिग्रहणासाठी १०.५६ लाख भाडे

By admin | Updated: January 10, 2015 00:32 IST

सिंहस्थ कुंभमेळा : सहमती न दिल्यास अधिग्रहण कायम

नाशिक : तपोवनातील जागामालक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहणासाठी दहा लाख ५६ हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले असून, या दरातच शेतकऱ्याच्या शेतीपिकांचा मोबदला व जमीन पूर्ववत करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचाही समावेश आहे. शेतकऱ्यांनी सहमतीने जमिनी दिल्यास त्यांचे स्वागतच अन्यथा साधुग्रामसाठी प्रशासनाची जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या सिंहस्थ आढावा बैठकीत तपोवनातील शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्याच्या आधारे जमीन अधिग्रहणास संमती दिल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु तो मोबदला किती असेल हे पालकमंत्र्यांनी जाहीर केले नाही. शुक्रवारी या संदर्भात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी शेतकऱ्यांच्या एक वर्षे जमीन अधिग्रहणाचे भाडे, त्यातून पिकाचे होणारे नुकसान व कुंभमेळा आटोपल्यानंतर जमीन पूर्ववत करण्यासाठी येणारा खर्च, असे सर्व मिळून एकरी दहा लाख, ५६ हजार रुपये भाडे देण्यात येणार असल्याचे सांगितले. साधुग्रामसाठी शेतकऱ्यांनी जागा देण्यास पूर्वी नकार दिला होता, आता मात्र त्यांनी सहमती दर्शविली आहे. त्यांचे कमीत कमी नुकसान व्हावे असा प्रशासनाचा प्रयत्न असून, पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेप्रमाणे हा दर निश्चित करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. तपोवनात अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या सर्वच जागांसाठी हाच दर राहणार असून, त्यात कमी-जास्त होणार नाही. त्यामुळे शेतकरी सहमती दर्शवतील व जे शेतकरी दर्शविणार नाहीत, त्यांच्यासाठी जमीन अधिग्रहणाची सुरू करण्यात आलेली प्रक्रिया कायम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)