शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

देवमामलेदारांच्या स्मारक नूतनीकरणाचा आज शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 00:16 IST

सटाणा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि.३) येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक नूतनीकरण व सुशोभीकरणाचा शुभारंभ होणार असून या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी बागलाणचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देसटाण्यात राज्यपालांची उपस्थिती : प्रशासनाची तयारी पूर्ण, अधिकाऱ्यांची बैठक

या सोहळ्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार दिलीप बोरसे यांचे बुधवारी सकाळी १० ला विशेष विमानाने आगमन होईल. यासाठी शहरालगत देवळा रस्त्यावर दोन हेलीपॅड उभारले आहेत. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शहरात प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असून त्यांच्या सूचनांचे सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी भांगरे यांनी यावेळी केले. हेलिपॅड, चिनार विश्रामगृह, स्मारक स्थळ, दगाजी चित्रमंदिर यांसह सर्व आवश्यक ठिकाणी पोलूस यंत्रणेचे विशेष पास असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी शहरातील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात नागरिकांसाठी भव्य स्क्रीन उभारण्यात आले असून या ठिकाणी सकाळी ९.३० वाजेनंतर प्रवेश बंद केला जाणार आहे. कार्यक्रमस्थळांच्या परिसरात सकाळी ९ वाजेपासून कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. शहरातील मोकाट जनावरांना त्यांच्या मालकांनी मोकळे सोडल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. बैठकीस नगराध्यक्ष सुनील मोरे, देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे, नगरसेवक मनोहर देवरे, गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव, महावितरणचे मधुकर बोरसे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकMuncipal Corporationनगर पालिका