शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
8
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
9
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
10
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
11
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
12
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
13
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
14
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
15
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
16
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
17
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
18
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
19
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
20
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
Daily Top 2Weekly Top 5

नवमतदार नोंदणी मोहीम

By admin | Updated: March 1, 2017 00:47 IST

नाशिक : मतदार यादीत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण वाढवावे, या उद्देशाने विशेष महिला मतदारांची नोंद घेण्याचा कार्यक्रम प्रशासनाने आखला आहे.

नाशिक : मतदार यादीत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण वाढवावे, या उद्देशाने विशेष महिला मतदारांची नोंद घेण्याचा कार्यक्रम प्रशासनाने आखला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मतदार नोंदणी सप्ताह राबविण्यात येत असून, या कार्यक्रमांतर्गत नावनोंदणी केलेल्या महिलांना त्यांच्या नावातील बदल, पत्त्यातील बदल आदि दुरुस्त्या करता येणार असून, नवीन मतदार नावनोंदणीही करता येणार आहे.  महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याने आगामी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम आखला आहे. निवडणुकीमध्ये महिला मतदारांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेतला जात आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) ६ ते ११ मार्च या कालावधीत महिला मतदारांच्या नावातील दुरुस्ती व अद्ययावतीकरणासह नवीन मतदारांची नोंदणीही करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली बीएलओना नमुना क्रमांक ६, ७ व ८ अ चे अर्ज वाटप करण्यात येणार असून ८ मार्चपर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेतले जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या भागात महिला मतदारांची संख्या कमी आहे, अशा भागांमध्ये विशेष लक्ष दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)