अतिक्रमण हटविण्याचे काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 01:00 PM2020-03-19T13:00:21+5:302020-03-19T13:00:57+5:30

चांदोरी : निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे गावात मागील तीन आठवडे पासून सुरू केलेले अतिक्र मण काढण्याचे काम अर्धवट अवस्थेत असून याचा परिणाम थेट रस्त्या लगत असणारे घरे व हॉटेल व दुकानदारावर होत आहे.

 The removal of encroachments is partial | अतिक्रमण हटविण्याचे काम अर्धवट

अतिक्रमण हटविण्याचे काम अर्धवट

Next

चांदोरी : निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे गावात मागील तीन आठवडे पासून सुरू केलेले अतिक्र मण काढण्याचे काम अर्धवट अवस्थेत असून याचा परिणाम थेट रस्त्या लगत असणारे घरे व हॉटेल व दुकानदारावर होत आहे. रस्त्यावरच ढिगारे पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
काम पूर्ण न झाल्याने येथील चौकातील हॉटेल व्यावसायिक व कुटुंबाचे संसार उघड्यावर पडल्याने व्यावसायिकाना रात्रीच्या वेळेस आपल्या घराचे रक्षण करावे लागत. संबंधित कंत्राटदाराने मोजमाप करून काम लवकर पूर्ण करून घ्यावे अशी मागणी आता स्थानिक नागरिक करत आहे. जेणे करून व्यावसायिक व घरांचे काम करून पूर्ववत करता येईल.
राज्य शासनाने १४७ कोटी रु पये खर्च करून महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्याला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्याचे काम गेल्या तीन तीन महिन्यापासून सिन्नर तालुक्यातून निफाड कडे जोडणार्या रस्त्याला सुरू आहे या रस्त्याची सरासरी रु ंदी नऊ मीटर इतकी होणार आहे. संबंधित रस्त्यात येणारे
अतिक्र मण संबंधित कंत्राटदाराने काढणे सुरू केले आहे किलोमीटर एक सिन्नर ते किलोमीटर अठरा हिवरगाव पर्यंत ह्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे अतिक्र मण नसून किलोमीटर २२ म्हाळसाकोरे येथे रस्त्यावर दुतर्फा पडक्या इमारती उभारून अतिक्र मण केले असल्याचा अंदाज बांधकाम विभागाच्या मोजणीत निदर्शनास आला आहे. त्यानुसार म्हाळसाकोरे येथील अतिक्र मण काढण्यास तीन आठवड्यांपूर्वी मोठ्या जोमाने संबंधित ठेकेदाराने सुरु वात केली होती. मात्र अर्धवट अंदाजे दहा दुकानांचे व घरांचे अतिक्र मण काढले व उर्वरित काम ठेकेदाराने बंद केले असून त्यामुळे अतिक्र मण काढण्यात आले आहे. तेथील हॉटेल व्यवसायिक घरे उघड्यावर पडली असुन रात्रभर जागे राहुन तेथील लोकांना घरांचे दुकानाची राखण करावी लागत आहे. त्यामुळे उर्वरित काम लवकर सुरू करून अधोरेखित रेषा टाकून देऊन काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करत आहे.

Web Title:  The removal of encroachments is partial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक