शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

खुल्या जागांवरील धार्मिक स्थळांना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:03 AM

मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेत समाजमंदिर, व्यायामशाळा, क्लबहाउस याप्रमाणेच १५ टक्क्यांपर्यंत धार्मिक स्थळांचेही बांधकाम करण्यास महापालिकेच्या महासभेने मंगळवारी (दि.२१) एकमताने मंजुरी दिली. सदरचा ठराव आता शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असून, शासनाने महासभेच्या ठरावावर शिक्कामोर्तब केल्यास शहरातील खुल्या जागांवरील सुमारे ५५० धार्मिक स्थळांना अभय मिळणार आहे.

ठळक मुद्देठराव आता शासनाकडे मंजुरीसाठी खुल्या जागांवरील सुमारे ५५० धार्मिक स्थळांना अभय १७४ धार्मिक स्थळे जमीनदोस्त

नाशिक : मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेत समाजमंदिर, व्यायामशाळा, क्लबहाउस याप्रमाणेच १५ टक्क्यांपर्यंत धार्मिक स्थळांचेही बांधकाम करण्यास महापालिकेच्या महासभेने मंगळवारी (दि.२१) एकमताने मंजुरी दिली. सदरचा ठराव आता शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असून, शासनाने महासभेच्या ठरावावर शिक्कामोर्तब केल्यास शहरातील खुल्या जागांवरील सुमारे ५५० धार्मिक स्थळांना अभय मिळणार आहे.  न्यायालयाच्या निर्देशानुसार, महापालिकेने रस्त्यांवर अडथळा ठरणारी १७४ धार्मिक स्थळे जमीनदोस्त केली. मात्र, मंजूर अभिन्यासातील खुल्या जागांवरील धार्मिक स्थळांबाबत बांधकाम अनुज्ञेय करण्यासंदर्भात महापालिका व सिडकोच्या विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद करण्याचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. याबाबत, गुरुमित बग्गा यांनी सांगितले, खुल्या जागांवर परिसरातील प्लाटधारकांचा हक्क असतो. त्यामुळे त्याठिकाणी काय बांधावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी सदर ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठवावा आणि रस्त्यांवरील जी धार्मिक स्थळे हटविली आहेत ती खुल्या जागांवर स्थलांतरित करावी, अशी सूचना केली. गजानन शेलार यांनीही रस्त्यांवरील अतिक्रमण हटविल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन करत सदर धार्मिक स्थळे स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेने परवानगी देण्याची मागणी केली.  मुशीर सय्यद यांनी यापुढे कारवाई थांबविणार आहे काय, असा सवाल केला. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले, महापालिका प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचा विपर्यास केला आहे. जी धार्मिक स्थळे रस्त्यात नव्हती, तीसुद्धा हटविण्यात आलेली आहेत. एक धार्मिक स्थळ हे परिसरातील शांतता राखण्याचे मोठे काम करत असते. त्यामुळे सदर ठरावावर तातडीने शासनाकडून कार्यवाही होण्याची गरज असल्याचे बोरस्ते यांनी स्पष्ट केले.  सभागृहनेता दिनकर पाटील यांनी मात्र, सदर कारवाई ही अतिक्रमण विभागामुळे नव्हे तर न्यायालयाच्या आदेशामुळे झाल्याने अतिक्रमण विभागाला श्रेय देण्यास नकार दिला. नगररचना विभागामार्फत अनेक फाइली पाठविण्यात आल्या असतानाही अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत नसल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला. अखेर, चर्चेनंतर महापौर रंजना भानसी यांनी सर्व उपसूचना घेऊन मंजूर अभिन्यासातील खुल्या जागांवर १५ टक्क्यांपर्यंत धार्मिक स्थळ उभारण्यास मान्यता दिली आणि सदरचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याचे आदेशित केले. महासभेच्या या निर्णयामुळे तूर्त सुमारे ५५० धार्मिक स्थळांना अभय मिळाले असून, आता शासनाच्या निर्णयावरच खुल्या जागांवरील धार्मिक स्थळांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. दारू दुकाने सुरू होतात, तर...! विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले, महामार्गावरील ५०० मीटर अंतरावर दारूच्या दुकानांना बंदी घालणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. दारू दुकाने वाचविण्यासाठी सरकारने धडपड केली आणि अनेक मार्ग डिनोटिफाइड केले. मग धार्मिक स्थळे ही जर एका पोलीस स्टेशनचे काम करत असतील तर सरकारने त्यांच्याबाबत सकारात्मक भूमिका का घेऊ नये, असा सवाल उपस्थित केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTempleमंदिर