शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात धर्माचे अधिष्ठान आवश्यक : पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:35 IST

मानवी जन्म फार मोठ्या पुण्याईने मिळाला असून भौतिक सुखात न गुरफटता या जीवनाचे सार्थक करण्यासाठी धर्माचे अधिष्ठान आवश्यक असल्याचे प्रतिपादन वर्तमान गच्छाधिपती आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिक : मानवी जन्म फार मोठ्या पुण्याईने मिळाला असून भौतिक सुखात न गुरफटता या जीवनाचे सार्थक करण्यासाठी धर्माचे अधिष्ठान आवश्यक असल्याचे प्रतिपादन वर्तमान गच्छाधिपती आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. शुक्रवारी(दि.२१) सकाळी विविध कार्यक्र मांसाठी त्यांचे नाशिक शहरात आगमन झाले. त्यानंतर गंजमाळ येथून मिरवणुकीने मुनीजनांचे टिळकवाडी येथील भाविक आराधना भवन येथे आगमन झाले.या मिरवणुकीत जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर आराधना भवनात प्रवचनात आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले की, जीवन क्षणभंगूर असून मोहमाया, सत्ता, संपत्ती- ऐश्वर्य यापेक्षा सत्य अहिंसा, त्याग, दया यांचा उपयोग केला तर जीवनात एक वेगळेच समाधान मिळते. तसेच आपले भविष्य उज्ज्वल बनते.सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक असून, धर्माशिवाय पर्याय नाही,असे प्रतिपादन त्यांनी केले.आचार्य परमपूज्य पुण्य पालसुरीजी म.सा. यांच्याबरोबर परमपूज्य आचार्य भुवन भूषण विजय जी म. सा. आचार्य वज्रभूषण विजयजी म.सा., आचार्य भव्यभूषण विजयजी म.सा., मुनिराज मुक्तिभूषण विजयजी म.सा., मैत्रिभूषण विजयजी म.सा, मुनिराज तीर्थभूषण विजयजी म.सा., तसेच जैन साध्वी हंस कीर्ती श्रीजी म.सा., अनेक साधुसंत उपस्थित होते.दीक्षार्थी मोहमई संसाराचा त्याग करून २९ जण जैन धर्म शास्त्राप्रमाणे दीक्षा घेणार आहेत.त्यांची ही मिरवणूक काढण्यात आली. दीक्षा ग्रहण समारंभ मुहूर्ता प्रमाणे होईल. परमपूज्य आचार्य पुण्यपाल सुरीजी म. सा. यांच्या उपस्थितीत देवळालीगाव येथे उपदानतपाचा जानेवारी २०१९ पासून प्रारंभ होईल. सदर सोहळा यशस्वीसाठी प्रवीण शहा,महेश भाई शहा,शैलेश शहा,अनुज शहा, गौतम सुराणा,प्रकाश बोथरा,सीलकेश कोठारी, भुपेंद्र शहा, डॉ. विक्र म शहा, सुरेश शहा,जितूभाई शहा आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.ठिकठिकाणी स्वागताच्या उभारल्या कमानीपरमपूज्य आचार्य भगवंत पुण्यपाल सुरीश्वरजी म.सा. यांचा शिष्य परिवार सुमारे १४०० साधू-साध्वींचा असून त्यांची सुमारे ६० वर्षांपूवी दिंडोरी तालुक्यातील वणी येथे दीक्षा संपन्न झाली होती. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व जैन समाजातील बांधवता आनंदाचे वातावरण पसरले होते.सकाळी गंजमाळ येथील सुविधींनाथ जैन मंदिरापासून त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. ठिकठिकाणी स्वागताच्या कमानी उभारल्या होत्या. विविध आकर्षक देखावे रांगोळीने सर्व रस्ते धर्ममय झाले होते. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. नाशिकचा ढोल, लेजीम, आदिवासी नृत्य, तुतारी असे मिरवणुकीचे स्वरूप होते.

टॅग्स :Jain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्रNashikनाशिक