शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नाते संबंधातले पदर अलगदपणे उलगडणारे ‘तुझ्या-माझ्यात’

By admin | Updated: October 21, 2015 22:45 IST

राज्य नाट्य स्पर्धेत नाटकाचा सहभाग

नाशिक : एमबीए झालेली आणि आजपर्यंत गृहिणी राहिलेली वयाच्या चाळीसाव्या वर्षी अचानक मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेते आणि सुखाने चाललेल्या संसारात अचानक विघ्न आल्याने संपूर्ण कुटुंबाची निर्माण झालेली नाजूक परिस्थिती ‘तुझ्या-माझ्यात’ या दोन अंकी नाटकात दाखविण्यात आली आहे. आयएमएच्या वतीने कालिदास कलामंदिर येथे तुझ्या-माझ्यात या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.नाशिकरोड येथील हौशी डॉक्टर कलावंतांनी या नाट्य प्रयोगात आपली कला सादर करण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. डॉक्टर कलावंत नेहमी आपल्या वैयक्तिक आयुष्यातली सुख-दु:खे बाजूला सारत रुग्णांना प्रसन्न चेहऱ्याने सामोरे जाऊन दिलासा देत असतानाच त्यांनी रंगमंचावर तन्मयतेने आपल्या केलेने पे्रक्षकांना खिळवून ठेवले.पती-पत्नी, स्त्री-पुरुष, पालक आणि मुले या सगळ्याच नात्यांचे बारकावे या दोन अंकी नाटकात अचूक टिपले आहेत. घरातील एका सदस्याने चौकटीबाहेर जाऊन नवे काही तरी करण्याचा प्रयत्न करत असताना कुटुंबाची वाताहत होऊ नये म्हणून कुटुंबातील प्रत्येकाने आपले स्वातंत्र्य जपत कौटुंबिक चौकट न मोडता नवनव्या बदलांना सामोरे जात ही चौकट कशी विस्तारली जाते याचे दर्शन या नाटकातून पहायला मिळते.नाटकाची रंगव्यवस्था सांभाळणाऱ्या आणि लेखिका तन्वी अमित यांनी ‘तुझ्या-माझ्यात’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेत असल्याचे यावेळी सांगितले. या नाटकात डॉ. प्राजक्ता भांबारे, डॉ. माधवी मुठाळ, डॉ. सुशील अहिरे, मोहन अमसेर, आसावरी वाणी यांनी भूमिका साकारल्या आहेत. (प्रतिनिधी)