दिंडोरीत बांधकाम कामगारांच्या नोंदणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:26 IST2021-01-23T18:26:29+5:302021-01-23T18:26:50+5:30

लखमापुर : बांधकाम कामगार नोंदणी योजनेअंतर्गत दिंडोरी तालुक्यातील ७० समाज बांधवांची नोंदणी करण्यात आली.

Registration of construction workers begins in Dindori | दिंडोरीत बांधकाम कामगारांच्या नोंदणीला सुरुवात

दिंडोरीत बांधकाम कामगारांच्या नोंदणीला सुरुवात

ठळक मुद्देनोंदणीकृत ५५ कामगारांना स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आले.

लखमापुर : बांधकाम कामगार नोंदणी योजनेअंतर्गत दिंडोरी तालुक्यातील ७० समाज बांधवांची नोंदणी करण्यात आली.

यावेळी नोंदणीकृत ५५ कामगारांना स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आले. यावेळी दिलीप पेंढारी व राजेंद्र भालेराव यांनी योजनेबाबत मार्गदर्शन केले. व या पुढील काळातही बांधकाम कामगारांनी जास्तीत जास्त नोंदणी करून योजनेचा फायदा घ्यावा असेही आवाहन करण्यात आले.
त्यानंतर बांधकाम कामगार नोंदणी कार्यालय नोंदणी अधिकारी सुधीर जगन्नाथ देवरे यांचा दिलीप पेंढारी यांचे हस्ते तसेच निशा आढाव यांचा राजेंद्र भालेराव यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी दिंडोरी पॅटर्न प्रतिनिधी राजेंद्र सोनवणे, प्रदिप जाधव, नारायण बल्हाल, रमेश क्षीरसागर, सुनील खैरनार, प्रकाश काळे, बापू पांडव, संजय शिरसाठ, शिवाजी धेपले यांच्यासह तालुक्यातील असंख्य कामगार बांधव उपस्थित होते. 

 

Web Title: Registration of construction workers begins in Dindori