उमराणे बाजार समितीत लाल पावसाळी कांदा विक्रीसाठी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:13 IST2021-09-25T04:13:55+5:302021-09-25T04:13:55+5:30
उमराणे : गेल्या चार-पाच दिवसांपासून येथील बाजार समित्यांत नवीन लाल पावसाळी कांद्यांची किरकोळ आवक होत असून त्यांचे दर दिवसेंदिवस ...

उमराणे बाजार समितीत लाल पावसाळी कांदा विक्रीसाठी दाखल
उमराणे : गेल्या चार-पाच दिवसांपासून येथील बाजार समित्यांत नवीन लाल पावसाळी कांद्यांची किरकोळ आवक होत असून त्यांचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. येथील स्व. निवृत्तिकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी कळमदरी येथील शेतकरी बाबूराव चौधरी यांनी चालू हंगामातील नवीन लाल कांदा विक्रीस आणला होता. त्यास केतन ट्रेेडर्स यांनी सर्वोच्च बोली लावत ५१०१ रुपये दराने खरेदी केला. दरवर्षी दसरा (विजयादशमी)च्या मुहूर्तावर लाल पावसाळी कांद्यांचा खरेदी-विक्रीचा प्रारंभ करण्यात येतो. परंतु आश्चर्य म्हणजे गेल्या तीन ते चार महिन्यांंपूर्वी सर्वत्र होत असलेेल्या अतिपावसामुळे कांदा उत्पादन घेणे तर दूरच; परंतु कांदा लागवडीसाठी रोपे जगविणेेही मुश्किल असतानाही कळमदरी येथील बाबूराव चौधरी यांंनी दीड ते दोन महिने आधीच शिवाय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत लाल कांद्याचे उत्पादन घेतल्याने तसेेच इतर बाजार समित्या सोडून चांगला दर मिळतो, या अपेक्षेने येथील स्व. निवृत्तिकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीस आणला, त्याबद्दल बाजार समितीच्या वतीने सचिव नितीन जाधव यांच्या हस्ते कांदा उत्पादक शेतकरी चौधरी यांचा शाल-श्रीफळ देेऊन सत्कार केला. त्यानंतर लाल कांद्याचे पूजन करण्यात येऊन लिलाव करण्यात आला. यावेळी केतन ट्रेडर्सचे संचालक व कांदा व्यापारी केेेतन बाफना यांनी सर्वोच्च बोली लावत ५१०१ रुपये दराने नवीन लाल कांदा खरेदी केला. लिलावाप्रसंगी येथील कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफना, कांदा व्यापारी सुुुुनील दत्तू देवरे, साहेबराव देवरे, शैलेश देवरे, महेंद्र मोदी, प्रवीण देवरे, मुन्ना अहेर, रमेश वाघ, बाजार समितीचे सहसचिव तुषार गायकवाड व बहुसंख्य व्यापारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, चालू वर्षी सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने लाल (पावसाळी) कांदा लागवड उशिरा झाली आहे. त्यामुळे अजून दीड ते दोन महिने तरी लाल (पावसाळी) कांदा बाजारात येणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे.
-------------------------------
उमराणे बाजार समितीत नवीन लाल कांदा उत्पादक चौधरी यांचा सत्कार करताना समितीचे सचिव नितीन जाधव व लिलावाप्रसंगी कांंदा व्यापारी, शेतकरी बांधव व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते. (२४ उमराणे कांदा)
240921\24nsk_31_24092021_13.jpg
२४ उमराणे कांदा