शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य रजा मंजुरीची होणार वसुली

By admin | Updated: September 3, 2016 23:58 IST

रजा मंजुरी घोटाळा : स्थायी समितीत निर्णय

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा आणून परस्पर रजा मंजूर केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य रजा मंजुरीची वसुली करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.तसेच गर्भवती महिलांची बुडीत मजुरीच न वाटप करणाऱ्या दोषी आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. स्थायी समितीच्या शानिवारी (दि.३) झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी या विषयाला सुरुवात केली. त्यावेळी अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनीही आमच्या अधिकारावर गदा आणून तुम्ही असे परस्पर रजा मंजुरीचे प्रकार का केले? अशी विचारणा केली. त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाक््चौरे यांनी याबाबत १९९४च्या शासन निर्णयानुसार आरोग्य उपसंचालकांच्या पत्रानुसार ६० दिवसांपर्यंतच्या रजा मंजुरीचे अधिकार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगितले. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी याबाबत सामान्य प्रशासन विभागाने माहिती देण्याचे सांगितले. त्यावर याबाबत अन्य जिल्हा परिषदांची आपण माहिती घेत आहोत, १६ जुलै १९९४ च्या शासन निर्णयाचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करू, असे सांगितले. प्रकाश वडजे यांनी यासंदर्भात अनियमितता झालेल्या रजा मंजुरीची संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वसुली करण्यात यावी, तसेच यास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, असे सांगितले. त्याचवेळी रवींद्र देवरे यांनी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याचे सांगितले. त्यावर आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे वारंवार मागणी करून आणि पत्र देऊनही ते काही कार्यवाही करीत नसल्याचे डॉ. वाक््चौरे यांनी सांगताच उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी एकीकडे त्यांच्याच पत्राच्या आधारे परस्पर रजा मंजूर करतात आणि दुसरीकडे त्यांना पत्र देऊन ते ऐकत नसल्याचे सांगतात. हा काय प्रकार आहे, अशी विचारणा केली. शैलेश सूर्यवंशी यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या दुरुस्तीच्या निविदा होऊनही या कामांना सुरुवात होत नसल्याबाबत तक्रार करीत ही कामे कधी सुरू होणार, अशी विचारणा केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी डॉ. सुशील वाक््चौरे यांना शासनाकडे निधी मागणी करण्याची सूचना केली. (प्रतिनिधी)