लासलगाव बाजारात कांद्याला विक्रमी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:51 IST2020-09-05T20:45:31+5:302020-09-06T00:51:49+5:30
लासलगाव : पावसाने दक्षिणेकडे कांदा खराब झाल्याने व प्रथम क्र मांकाच्या कांद्याला मागणी वाढल्याने येथील बाजारात कांदा भावात तेजी होत २४,६५२ क्विंटल कांदा १००० ते २४११ व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटल भावाने झाला.

लासलगाव बाजारात कांद्याला विक्रमी दर
लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : पावसाने दक्षिणेकडे कांदा खराब झाल्याने व प्रथम क्र मांकाच्या कांद्याला मागणी वाढल्याने येथील बाजारात कांदा भावात तेजी होत २४,६५२ क्विंटल कांदा १००० ते २४११ व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटल भावाने झाला.
बाजारात प्रथम क्र मांकाचा कांदा विक्र ीस कमी येत आहे. ३१ आॅगस्ट रोजी लासलगाव बाजार समितीत ७८०० क्विंटल कांदा लिलाव ५०१ ते १९३१ व सरासरी १६५० रुपये भावाने झाला. गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ६९,७२० क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ५०१ कमाल रु पये १,८७४ तर सर्वसाधारण रु पये १,४९२ प्रतिक्विंटल राहिले.अभोण्यात कमाल भाव २३६० रूपयेअभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात गुरुवारी
(दि. ३) ४१५ ट्रॅक्टर्सद्वारे ११ हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन कमाल २३६० रु पये, किमान ५०० रु पये तर सरासरी २००० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गेल्या तीन दिवसात भावात ५०० रु पयाने वाढ झाली आहे. कांदा भावात सुधारणा होत असल्याने कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर माल विकण्यासाठी आवारात आणत आहेत, असे असले तरी यंदा वातावरणामुळे चाळीत साठवलेल्या कांद्याचे सडण्याचे प्रमाण वाढले आहे.उन्हाळी कांदा बियाणांच्या टंचाईमुळे चालूवर्षी अनेक शेतकऱ्यांनी शेजारील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महागडे बियाणे खरेदी केले आहे. परंतु या बियाणांच्या दर्जाबद्दल कोणतीही हमी नसल्यामुळे फसवणुकची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कांदा बियाणे खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांनी केले आहे.