विधान परिषदेच्या नियुक्तीसाठी नाशिकमधून तीन नेत्यांच्या नावांची शिफारस 

By संजय पाठक | Updated: July 19, 2024 10:24 IST2024-07-19T10:23:15+5:302024-07-19T10:24:05+5:30

लक्ष्मण सावजी हे 1992 ते 97 या कालावधीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी अधिक आहे.

Recommending names of three leaders from Nashik for appointment to Vidhan Parishad  | विधान परिषदेच्या नियुक्तीसाठी नाशिकमधून तीन नेत्यांच्या नावांची शिफारस 

विधान परिषदेच्या नियुक्तीसाठी नाशिकमधून तीन नेत्यांच्या नावांची शिफारस 

नाशिक- विधान परिषदेच्या बारा नियुक्त आमदारांसाठी  नाशिक महानगर भाजपाने तीन नेत्यांची नावे प्रदेश भाजपाकडे पाठवली आहे. यात नाशिक पूर्व विधानसभेचे माजी आमदार बाळासाहेब सानप, पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, आणि विजय साने यांचा समावेश आहे.

प्रदेश भाजपाकडून दरवेळेस प्रमाणे यंदाही नावांची शिफारस मागवण्यात आली होती त्यानुसार या तिघांची नावे पाठवण्यात आली आहे. यातील माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी उपमहापौर आणि। महापौर पदही भूषवले आहे तर विजय साने यांनी स्थायी समिती सभापतीपद भूषवले आहे. लक्ष्मण सावजी हे 1992 ते 97 या कालावधीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी अधिक आहे. त्यामुळे पक्ष या सर्वांपैकी योग्य नावाचा विचार करेल असे भाजपाचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सांगितले.

 

Web Title: Recommending names of three leaders from Nashik for appointment to Vidhan Parishad