शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बॉलिवुडच्या कोरिओग्राफरसह रिॲलिटी शोच्या अभिनेत्रीला रेव्ह पार्टी भोवली; इगतपुरीत दोन बंगल्यांवर पोलिसांचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 19:31 IST

ड्रग्ज, कोकेन पावडर, हुक्का जप्त; ग्रामीण पोलिसांचे पथक मुंबईला रवाना

ठळक मुद्देड्रग्ज, कोकेन पावडर, हुक्का जप्त.ग्रामीण पोलिसांचे पथक मुंबईला रवाना

नाशिक : बॉलिवुडमधील दोन कोरिओग्राफर, तामिळ आणि काही हिंदी चित्रपटांत अभिनय केलेल्या अभिनेत्रींसह एका रिॲलिटी-शोमधील अभिनेत्री यांना इगतपुरीमध्ये रेव्ह पार्टी करणे चांगलेच भोवले. पोलिसांच्या धाडीत येथील बंगल्यातून १० पुरुष आणि १२ महिला मिळून एकूण २२ व्यक्ती ड्रग्ज, कोकेन, गांजा सारख्या अमली पदार्थांचे सेवन करताना पोलिसांना सापडले.

नाशिकमधीलइगतपुरीचा परिसर नेहमीच पर्यटकांपासून बॉलिवुडच्या कलाकारांना भुरळ घालणारा ठरला आहे. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य अनेकांना खुणावते. याचाच गैरफायदा घेत अंमली पदार्थांची नशा करण्याकरिता मुंबई येथून हायप्रोफाईल सिनेतारकांचाही राबता या भागात असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा दिसून आले आहे. येथील दोन खासगी बंगल्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ड्रग्ज, कोकेन, हुक्कासारख्या अंमली पदार्थांची नशा करत बॉलिवूडशी संबंधित चार महिलांसह एकूण २२ उच्चभ्रू व्यक्तींचा समुहाची पार्टी होत असल्याची गोपनीय माहिती नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकत या सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी अंमली पदार्थांची नशा करत ‘रेव्ह पार्टी’च्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्या सर्वांना ताब्यात घेत पोलीस वाहनातून इगतपुरी पोलीस ठाण्यात आणले.

दरम्यान, याप्रकरणी विनापरवाना अंमली पदार्थ बाळगणे व त्याचे सामूहिकपणे सेवन करणे आणि कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करत एकत्र येऊन गर्दी जमविल्याप्रकरणी विविध कलमान्वये संबंधितांविरुध्द इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विदेशी महिलाही जाळ्यात१०पुरुष, १२ महिलांसह एकुण २२उच्चभ्रू व्यक्तींचा मोठा समुह इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला व स्काय लगून व्हिला या आलिशान बंगल्यांमध्ये रेव्ह पार्टी करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडले. यामध्ये काही महिला थेट बॉलिवुडशी संबंधित असून एक विदेशी महिलेचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही महिला इराणची नागरिक असल्याचे अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

अंमली पदार्थांचा पुरवठा मुंबईतून?रेव्ह पार्टी करण्यासाठी इगतपुरीत दाखल झालेला २२लोकांचा हायप्रोफाईल समुहाने आपल्यासोबत अंमली पदार्थांचा मोठा साठा मुंबईतून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. हा पुरवठा कोठून आणि कोणी केला याबाबतचा तपास करण्याकरिता नाशिक ग्रामीण पोलिसांचे एक स्वतंत्र पथक तातडीने मुंबईत रवाना करण्यात आले आहे.

गोपनीय माहितीवरुन शनिवारी मध्यरात्री आम्ही छापा टाकला. या कारवाईत एकूण २२ लोकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन कोरियोग्राफर, एक रिॲलिटी शोमधील अभिनेत्री आणि एक विदेशी महिलेचा समावेश आहे. कोकेनसारखे अंमली पदार्थांचे सेवन या सर्वांकडून केले जात होते. अंमली पदार्थाचा पुरवठा कोणी व कोठून केला? यांच्यासोबत अजून काही साथीदार होते का? आदी बाबींचा तपास केला जात आहे. एक पथक मुंबईला रवाना झाले आहे.सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिकigatpuri-acइगतपुरीPoliceपोलिसDrugsअमली पदार्थ