धान्यपुरवठ्याबाबत वाचला तक्रारींचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 04:52 PM2020-01-22T16:52:57+5:302020-01-22T16:53:14+5:30

पुरवठा विभागा कडून शिधा पत्रिका लाभार्थी कुटुंबांची कुचंबणा

 Read the complaints about grain supply | धान्यपुरवठ्याबाबत वाचला तक्रारींचा पाढा

धान्यपुरवठ्याबाबत वाचला तक्रारींचा पाढा

googlenewsNext
ठळक मुद्देविभक्त कुटुंबांना नवीन रेशन कार्ड मिळावेत व आदिवासी कुटुंबाचा अंत्योदय योजनेतील समावेश वाढवावा


लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : पुरवठा विभागा कडून शिधा पत्रिका लाभार्थी कुटुंबांची होत असलेली कुचंबणा व स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत असलेल्या अरेरावी बद्दल तालुक्यातील ग्रामीण भागातील अदिवासी महिलांनी आमदार दिलीप बोरसेंकडे तक्र ारींचा पाढा वाचला.
बोरसे यांनी तालुका पुरवठा अधिकारी एस.जी.भामरे यांना कार्यालयात बोलावून ग्रामिण भागातील महिलांच्या तक्र ारी ऐकून घेण्यासाठी पाचारण केले. यावेळी भिलवाड येथील महिलांनी पुरवठा विभागाच्या तक्रारी मांडल्या. कुटुंब विभाजना मुळे विभक्त कुटुंबांना नवीन रेशन कार्ड मिळावेत व आदिवासी कुटुंबाचा अंत्योदय योजनेतील समावेश वाढवावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी बोरसे यांनी तालुका पुरवठा अधिकारी भामरे यांना तक्रारी निवारण्यासाठी सूचना केल्या. यावेळी कमलबाई पवार, जिजाबाई सोनवणे, सुशिलाबाई सोनवणे, मालतीबाई पवार, सम्रताबाई माळी, हिराबाई सोनवणे, लताबाई सोनवणे, चंद्रकला पाठक,निर्मलाबाई चौधरी आदींसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title:  Read the complaints about grain supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक