येवला औद्योगिक वसाहतीत कच्च्या मालाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2022 01:50 IST2022-06-17T01:50:19+5:302022-06-17T01:50:36+5:30

अंगणगाव येथील येवला औद्योगिक सहकारी वसाहतीतील प्लायवूड फॅक्टरीच्या कच्च्या मालाला अकस्मात आग लागून मोठी वित्त हानी झाली.

Raw material fire in Yeola industrial estate | येवला औद्योगिक वसाहतीत कच्च्या मालाला आग

येवला औद्योगिक वसाहतीत कच्च्या मालाला आग

येवला : अंगणगाव येथील येवला औद्योगिक सहकारी वसाहतीतील प्लायवूड फॅक्टरीच्या कच्च्या मालाला अकस्मात आग लागून मोठी वित्त हानी झाली.

येवला औद्योगिक सहकारी वसाहतीतील रविदीप इंडस्ट्रीज या प्लायवूड व दरवाजे तयार करणाऱ्या फॅक्टरीच्या प्लॉट २ समोर ठेवलेल्या कच्च्या मालाला गुरुवारी, (दि. १६) मध्यरात्रीच्या सुमारास अकस्मात आग लागली. घटनेची माहिती मिळताच येवला नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. सलग पाच तास प्रयत्न केल्यानंतर आग विझविण्यात यश आले. या आगीत महावितरणची सप्लाय वायरदेखील वितळून गेली.

Web Title: Raw material fire in Yeola industrial estate