Ravalji Gram Panchayat's activities on a farmer's study tour | शेतकरी अभ्यास दौऱ्यावर रवाना रवळजी ग्रामपंचायतीचा उपक्रम
रवळजी ग्रामपंचायतच्या वतीने शेतकरी अभ्यास दौºयासाठी रवाना झालेले शेतकरी भास्कर भालेराव, बबन वाघ, दिपक गांगुर्डे, सुभाष पगार, विनोद भालेराव, हिरामण वाघ, अनिलेश जाधव, अजय भालेराव, दिपक जाधव आदी.

ठळक मुद्देकृषी प्रदर्शन महोत्सवाला देखील शेतकरी वर्ग उपस्थिती लावणार

कळवण : कळवण तालुक्यातील रवळजी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकरी दौर्याचे आयोजन करण्यात आले असून. यासाठी रवळजी गावातील २० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्व अभ्यास दौºयासाठी जाणारे शेतकरी हे तरु ण युवक वर्गातील आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत आता नविन तंत्रज्ञान पध्दतीचा वापर शेतीत कसा होऊ लागला आहे, व अशा सर्व विषयाची माहिती शेतकºयांना व्हावी यासाठी या अभ्यास दौºयांचे आयोजन केले असल्याची माहिती ग्रामसेवक चव्हाण यांनी दिली.
सन २०१९-२० च्या १४ व्या वित्त आयोगामधुन २५ टक्के खर्च करण्याची तरतुद आहे. शिक्षण आरोग्य उपजिवीका त्यातुन हा शेतकरी अभ्यास दौरा काढण्यात आला आहे. कळवण तालुक्यातुन प्रथमच हा शेतकरी अभ्यास दौरा आयोजित केला असल्याची माहिती देखील संबंधित अधिकाºयांनी यावेळी दिली.
शेतकरी अभ्यास दौºयामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, राळेगणसिध्दी, हिवरे बाजार, पुणे, औरंगाबाद तसेच बारामती येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शन महोत्सवाला देखील शेतकरी वर्ग उपस्थिती लावणार आहेत.
शेतकरी दाºयासाठी भास्कर भालेराव, बबन वाघ, दिपक गांगुर्डे, सुभाष पगार, विनोद भालेराव, भाऊसाहेब बागुल, साहेबराव गांगुर्डे, प्रकाश वाघ, राजेंद्र वाघ, संदिप वाघ, सागर निकम, विजय वाघ, सचिन भालेराव, हिरामण वाघ, अनिलेश जाधव, अजय भालेराव, दिपक जाधव, धनराज कुवर, पप्पु भालेराव, बाबुलाल पालवी, अशोक जगताप आदींची निवड झाली आहे.

कळवण तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीनी रवळजी ग्रामपंचायतचा आदर्श घेऊन गावातील युवक शेतकरी बांधवाना पारंपरिक शेती ऐवजी नविन तंत्रज्ञान पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी कृषी विभागाशी सल्ला मसलत करु न अभ्यास दौºयाचे आयोजन करावे.
- नितीन पवार, आमदार.

Web Title: Ravalji Gram Panchayat's activities on a farmer's study tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.