शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला रथोत्सव

By admin | Updated: November 15, 2016 01:31 IST

त्रिपुरारी पौर्णिमा : हजारो भाविकांचा सहभाग

त्र्यंबकेश्वर : त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सोमवारी दुपारी सव्वाचार वाजता पाच बैलजोड्यांच्या साह्याने ३१ फूट उंचीच्या भव्य रथाची त्र्यंबकेश्वर मंदिरापासून ते कुशावर्त तीर्थापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सातच्या सुमारास ज्या मार्गाने नेला त्याच मार्गाने पुनश्च मंदिराकडे आणण्यात आला. यावेळी संपूर्ण रस्ता आकर्षक फुलांच्या रांगोळ्यानी सजविण्यात आला होता. देवस्थानच्या पारंपरिक वाजंत्री-बॅण्ड पथकाच्या गजरात रथ मिरवणूक काढण्यात आली. रथापुढे विश्वस्त, मानकरी, प्रतिष्ठित चालत होते.भव्यदिव्य असा हा रथ त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राबरोबर त्र्यंबकेश्वर देवस्थानचे भूषण समजला जातो. भारतातील प्रमुख ३८ रथांपैकी हा रथ आहे. आज रथ पाहण्यासाठी शहरात हजारो यात्रेकरू, परिसरातील भाविक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने आले होते. रविवारी पहाटे २.३० ते ५ वाजेपर्यंत वैकुंठ चतुर्दशी (वैकुंठी) विशेष महापूजा, पालखी सोहळा व हरिहर भेट झाली. त्याच दिवशी वैकुंठ चतुर्दशीनिमित्त सरदार विंचूरकर यांच्या वतीने दुपारी १.३० ते ४ वा.पर्यंत त्यांचे पुरोहित रवींद्र अग्निहोत्री यांनी पूजा केली, तर सोमवारी दुपारी रथ मिरविण्यापूर्वी सरदार विंचूरकर यांच्या वतीने रथाची पूजा, त्र्यंबकेश्वर राजाची महापूजा पुरोहित रवींद्र अग्निहोत्री यांनी केली. पेशवे यांच्या वतीने महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाची महापूजा, दीपमाळेची महापूजा रुईकर यांच्या वतीने दिलीप रुईकर यांनी केली. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे मानकरी, पूजक आदिंचा उत्स्फू र्त सहभाग होता. देवाची आरती करण्याचा मान विलास वाडेकर (वाडेकर घराणे) यांना असल्यामुळे त्यांनी आरती म्हटली आणि त्यानंतर रथ सुरू करण्यात आला. रथावर ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवण्यात आली होती. रथ पूर्णपणे पुष्प सजावटीने शृंगारला होता. त्यामुळे रथाचे सौंदर्य खुलून दिसत होते. मध्यभागी भगवान त्र्यंबकराजाचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान होता. संपूर्ण रस्त्यावर विविध सेवाभावी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी पुष्परांगोळ्या रेखाटल्या होत्या. त्यात ज्योतिर्लिंग मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग होता. रथावर आकर्षक व नयनमनोहर विद्युतरोषणाई करण्यात आली होती. (वार्ताहर)