सीटूचा घोटी टोलनाक्यावर रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 16:16 IST2018-08-09T16:15:10+5:302018-08-09T16:16:14+5:30
आंदोलन : शेतकरी-कामगारांच्या मागण्यांचे निवेदन

सीटूचा घोटी टोलनाक्यावर रास्तारोको
घोटी : मुंबई नाशिक महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर गुरुवारी (दि.९) सिटूच्या वतीने शेतकरी व कामगारांच्या मागण्यांसाठी रस्तारोको करण्यात आला. यावेळी सिटूच्या वतीने नायब तहसीलदार संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
सिटूच्या वतीने देशभरात रास्तारोको,आंदोलने जागोजागी करण्यात आले. त्याच धर्तीवर इगतपुरी तालुक्यात मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर सिटूचे जिल्हा नेते देविदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व कामगारांच्या न्याय हक्कासाठी काही काळ आंदोलन करीत रास्तारोको करण्यात आला. शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा यांसह कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी,कामगार विरोधी मालक धार्जिने बदल रद्द करा,समान वेतन समान शिक्षण लागू करा, ठेकेदार पद्धतीवरील कामगार कायम करा आदि मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संजय शिंदे,सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत लाखे,शेतकरी नेते कांतीलाल गरु ड, विश्वास दुभाषे, सुनील मालुंजकर, हिरामण भोर, भगवान नाठे, ज्ञानेश्वर काजळे, दत्ता राक्षे,भाऊसाहेब जाधव आदीसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.