शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

दुर्मिळ नाणी, नोटा पहाण्यासाठी नाशिककरांची गर्दी,सोन्याच्या तिकिटांनी वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 3:54 PM

नाशिक कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्युमिसमॅटिक अ‍ॅँड रेअर आयटम्सतर्फे या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.प्रदर्शनाचा रविवारी अखेरचा दिवस असल्याने व साप्ताहिक सुट्टीची संधी साधून नाशिककरांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली.

ठळक मुद्देदुर्मिळ नाणी, नोटांचे प्रदर्शन सोन्याच्या तिकिटांनी वेधले लक्षतरुणांनी जाणून घेतली शस्त्रांची माहिती

नाशिक : शिवकालीन चलनी नाणी व शस्त्रास्त्रांसह विविध संस्थांनांची नाणी, ब्रिटीशकालीन नाणी, सोन्या, चांदीची, तांब्या-पितळाची, मातीची नाणी, चालू चलनातील नाणी, नोटा असा अमुल्य ऐतिहासिक ठेवा असलेल्या प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. यावेळी प्रदर्शनात सहभागी झालेल्या जवळपास 50 ते 60 संग्रहकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.इंद्रप्रस्थ हॉल येथे नाशिक कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्युमिसमॅटिक अ‍ॅँड रेअर आयटम्सतर्फे या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.प्रदर्शनाचा रविवारी अखेरचा दिवस असल्याने व साप्ताहिक सुट्टीची संधी साधून नाशिककरांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली. या प्रदर्शनात नाशिक, जुन्नर परिसरात सापडलेली सातवाहन काळातील कासे, लीड, चांदी व तांब्याची नाणी, गुलशनाबाद अर्थात नाशिकची चांदीची नाणी, पेशवे, इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, उदयपूरच्या राणाप्रताप चौहाण, बिकानेर, जयपूर, हैदरबाद व अहमदनगरच्या निजामाची नाणी, कच्छ राजाची नाणी, ब्रिटिशकालीन नाणी, नोटा, पोतरुगीज, डच काळातील विविध नाणी पहायला व विकत घ्यायला उपलब्ध करून देण्यात आल होते. रविवारी (दि.7) या प्रदर्शनाचा समारोप झाला. नाशिककरांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून नाण्यांचा एक अनोखा खजिनाच पहायला मिळाला असून प्रदर्शनात संस्थेतर्फे विद्याथ्र्याना इतिहास व छंदाची आवड निर्माण व्हावी या म्हणून काही नाणी व पोस्टाची तिकिटांचे वितरण करण्याच आले.शस्त्रसत्र ठरली आकर्षणाची केंद्रनाशिकमध्ये तीन दिवस सुरू असेल्या या दुर्मिळ नाण्यांच्या प्रदर्शनाच शिवकालीन शस्त्रस्त्रंचाही समावेश करण्यात आला होता.यातील ऐतिहासिक मुघल तलवार, मराठा तलवार,तेगा, मराठा धोप, समशीर, राजपूत तलवार, गुप्ती, अंकुश, गुजर्, दांडपट्टा,विविध प्रकारच्या ढाली,वाघनखे, मराठा क टय़ार, बिछवा, सैनिकी कटय़ार, जाळीची कटय़ार,नागफनी, ऐतिहासिक कुलुप आदि विविध पौराणिक वस्तुंचा खजिना नाशिककरांना या प्रदर्शनाच्या माध्यामातून पाहता आला.सोन्याच्या नोटांनी वेधले लक्षभूटान येथील 1975 मधील सोन्याचे स्टॅम्प व अंटीगुवा अ‍ॅण्ड बारबुडा यादेशीतील 1987 मधील सोन्याच्या नोटांसोहबतच देशविदेशातील सोन्याची नाण्यानी नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. या नोटा व स्टॅम्प 23 कॅरेट सोन्यापासून बनविलेल्या असून अशा नोटा पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती.

 

टॅग्स :historyइतिहासNashikनाशिक