एबीपी वेडींग्जच्या माध्यमातून ओळख वाढवून तरुणीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 15:48 IST2018-12-14T15:46:03+5:302018-12-14T15:48:09+5:30
नाशिक : एबीपी वेडिंग्ज या विवाह जमविणाऱ्या संकेतस्थळाच्या माध्यमातून तरुणीशी ओळख करून तिला विवाहाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे़ रविश प्रभाकर दुरगुडे (३५, रा. घाटकोपर, मुंबई) असे बलात्कार करणा-या संशयिताचे नाव असून त्याने आपला विवाह झाल्याचेही लपवून ठेवल्याचे समोर आले आहे़

एबीपी वेडींग्जच्या माध्यमातून ओळख वाढवून तरुणीवर बलात्कार
नाशिक : एबीपी वेडिंग्ज या विवाह जमविणाऱ्या संकेतस्थळाच्या माध्यमातून तरुणीशी ओळख करून तिला विवाहाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे़ रविश प्रभाकर दुरगुडे (३५, रा. घाटकोपर, मुंबई) असे बलात्कार करणा-या संशयिताचे नाव असून त्याने आपला विवाह झाल्याचेही लपवून ठेवल्याचे समोर आले आहे़
पेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका परिसरातील दीपालीनगर परिसरात राहणा-या तरुणीशी एबीपी वेडिंग्ज या लग्न जमविणा-या संकेतस्थळाच्या माध्यमातून संशयित रविश दुरगुडे याने ओळख वाढविली. यानंतर या तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून खोटे बोलून विवाह झाल्याचे दडवून ठेवले़ तसेच १ आॅक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत तरुणीवर दीपालीनगर तसेच इंदिरानगर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला़
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित दरगुडेविरोधात फसवणुक तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.