माजी शिक्षणधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 01:46 IST2022-04-20T01:46:08+5:302022-04-20T01:46:51+5:30

पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सुमारे सहा वर्षे सोबत राहत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करत शारीरिक अत्याचार केल्याची घटना गोविंदनगर परिसरात घडली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून धुळ्याच्या एका माजी शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rape case against former education officer | माजी शिक्षणधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

माजी शिक्षणधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

ठळक मुद्देअंबड पोलीस ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

नाशिक : पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सुमारे सहा वर्षे सोबत राहत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करत शारीरिक अत्याचार केल्याची घटना गोविंदनगर परिसरात घडली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून धुळ्याच्या एका माजी शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सहा वर्षांपूर्वी पीडिता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात काही कामानिमित्त गेल्या असता, तेथे संशयित प्रवीण वसंत अहिरे (रा. गोविंदनगर) यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री होऊन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान, संशयित अहिरे यांनी पीडितेला विश्वासात घेत लग्न करण्याचे आमिष दाखविले. दरम्यान, २०१६ पासून आतापर्यंत पीडितेसोबत वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसांनी संशयित अहिरेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला व संशयित आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे असून मागील सहा वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित अहिरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सखोल तपास केला जात आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सांगितले. याबाबत पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक फडोळ या करीत आहेत.

Web Title: Rape case against former education officer