शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या रंगरंगोटीने आश्चर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:40 IST

बाजार समितीच्या रंगरंगोटीने आश्चर्य

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवड गुरुवारी (दि. २०) होणार असून, नवीन सभापतींच्या कक्षाला सुरू करण्यात आलेल्या रंगरंगोटीने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काही संचालकांच्या मते हे किरकोळ दहा-वीस हजारांचे काम असून, त्यास मंजुरी मिळणे अवघड नाही.दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सहलीला गेलेल्या संचालकांचा ताफा मंगळवारी (दि.१८) मध्य प्रदेशातील एका धार्मिक ठिकाणी पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारी (दि.१९) हा संचालकांचा ताफा सहलीवरून नाशिकला पोहोचणार असल्याचे समजते.गेल्या दोन दिवसांपासून दिंडोरीरोडवरील बाजार समितीच्या आवारात प्रशासकीय कार्यालयाला तसेच सभापती कक्षाला रंगरंगोटी काम सुरू करण्यात आल्याने त्याबाबत काही संचालकांनी आक्षेप घेतल्याचे समजते. या रंगरंगोटीच्या कामास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची किंवा बाजार समितीच्या संचालक मंडळाची कधी मंजुरी मिळाली याबाबत बाजार समितीच्या वर्तुळात चर्चा सुरू होती. ४ जुलैला झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विशेष बैठकीत एकूण १८ संचालकांपैकी बैठकीस उपस्थित १६ पैकी १५ संचालकांनी विद्यमान सभापती देवीदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला होता. त्यामुळे सभापती पदासह उपसभापतिपदाची निवडणूक २० जुलै रोजी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी जाहीर केली आहे.होती. सभापतिपदावर शिवसेनेचे जिल्हा बॅँक संचालक शिवाजी चुंभळे यांनी दावा सांगितला असून, त्यांनीच बाजार समितीच्या डझनभर संचालकांना सहलीला नेल्याची चर्चा आहे. उपसभापतिपदासाठी संजय तुंगार, युवराज कोठुळे किंवा चंद्रकांत निकम यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक होऊन त्यात माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या गटाचे १८ पैकी १५ संचालक येऊन सभापतिपदी देवीदास पिंगळे यांची, तर उपसभापतिपदी शंकरराव धनवटे यांची निवड करण्यात आली होती.३ वर्षांत तीन सभापती च्नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाचा कार्यकाळ एक वर्षाचा ठरवण्यात आला असून, पहिल्या वर्र्षी शिवाजी चुंभळे सभापती होणार आहेत, तर दुसऱ्या वर्षी भाजपाचे तुकाराम पेखळे आणि तिसऱ्या वर्षी विश्वास नागरे हे सभापतिपद भूषविणार असल्याची माहिती सहलीला गेलेल्या संचालकांनी दिली.